व्हॉट्सअॅप लवकरच पालकांसाठी दिलासादायक ठरणारे (parents) एक महत्त्वाचे फीचर घेऊन येत असल्याचे संकेत मिळत आहेत. जानेवारी २०२६ मधील ताज्या अहवालानुसार, लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेचा विचार करून व्हॉट्सअॅप ‘पॅरेंटल कंट्रोल’ प्रणालीवर काम करत आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे धोके लक्षात घेता हे अपडेट पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.या नव्या फीचरअंतर्गत व्हॉट्सअॅप मुलांसाठी स्वतंत्र ‘सेकंडरी अकाऊंट’ची सुविधा देणार आहे. हे अकाऊंट थेट पालकांच्या मुख्य व्हॉट्सअॅप अकाऊंटशी लिंक असेल. त्यामुळे पालकांना एकाच ठिकाणाहून मुलांच्या अकाऊंटवरील विविध सेटिंग्ज आणि वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. मुलांचा डिजिटल वापर अधिक सुरक्षित आणि नियंत्रीत ठेवण्याच्या दृष्टीने ही मोठी पायरी मानली जात आहे.

या प्रणालीमुळे पालकांना मुलांशी कोण संपर्क साधू शकतो, (parents)हे ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. डीफॉल्ट सेटिंगनुसार मुले फक्त सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्ट्सशीच संवाद साधू शकतील. यामुळे अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या मेसेजेस किंवा कॉल्सचा धोका कमी होण्यास मदत होईल. याशिवाय मुलांच्या अकाऊंटवर होणाऱ्या काही ठराविक हालचालींची माहिती पालकांना त्यांच्या स्वतःच्या व्हॉट्सअॅपवर अपडेट्सच्या स्वरूपात मिळू शकणार आहे.या फीचरमध्ये प्रायव्हसी सेटिंग्जवरही पालकांना नियंत्रण मिळणार आहे. मुलांच्या प्रोफाईल फोटो, लास्ट सीन किंवा स्टेटस यांसारख्या गोष्टी कशा दिसाव्यात, याचा निर्णय पालक घेऊ शकतील. यासोबतच मुलं दिवसातून किती वेळ व्हॉट्सअॅप वापरू शकतात, यावरही वेळेची मर्यादा घालण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे स्क्रीन टाइम नियंत्रणात ठेवणे पालकांसाठी सोपे होईल.

महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्व नियंत्रणांनंतरही मुलांचे वैयक्तिक (parents)चॅट्स आणि कॉल्स पालक वाचू शकणार नाहीत. व्हॉट्सअॅपचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन या नव्या फीचरमध्येही कायम राहणार आहे. त्यामुळे मुलांची खाजगी माहिती आणि संवाद सुरक्षित राहील, असा कंपनीचा दावा आहे.सध्या हे पॅरेंटल कंट्रोल फीचर अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनमध्ये चाचणीच्या टप्प्यावर आहे. सर्वसामान्य युजर्ससाठी ते अद्याप उपलब्ध नसले तरी येत्या काही महिन्यांत अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे फीचर प्रत्यक्षात आल्यास पालकांना मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत अधिक आत्मविश्वास वाटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा