लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.(quickly)लाडकी बहीण योजनेत महिलांना आता दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत.लाडक्या बहिणींना पुढच्या चार दिवसातच पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत याआधीच नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता. परंतु तेव्हा फक्त १५०० रुपये जमा झाले. त्यानंतर महिलांच्या मनात निराशा होती. त्यानंतर आता मात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येणार (quickly) असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विट करत माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार.. मकर संक्रांतीची मोठी भेट !१४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३००० रुपये जमा होणार !, असं म्हटलं आहे. याचसोबत एक पोस्टरदेखील शेअर केले आहे.

ज्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट, (quickly) अशा आशयाची माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे.लाडकी बहीण योजनेत मागच्या महिन्यात फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला होता. महिलांना मात्र ३००० रुपये येतील, अशी आशा होती. त्याचसोबत हप्तादेखील लांबणीवर जात असल्याने महिलांचा हिरमोड झाला आहे. परंतु आता महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. त्यांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहेत.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा