सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे.(government)सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जून महिन्यात हा महागाई भत्ता वाढवला जातो. त्यामुळे आता जानेवारी २०२६ चा महागाई भत्ता कधीपासून वाढणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.

महागाई भत्त्याचा आढावा आता जानेवारी महिन्यात होणार आहे. (government)दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. याआधी जुलै २०२५ मध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. महागाई भत्ता ५४ टक्क्यांवरुन ५८ टक्के केला होता. आतादेखील कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की, AICPI-IW १४७ ते १४८ च्या जवळपास राहिला तर महागाई भत्ता ३ ते ५ टक्क्यांनी लाढला जाऊ शकतो.

ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजीस सिंग पटेल यांनी सांगितले की,(government) डिसेंबर २०२५ मध्ये AICPI-IW १४७ असेल तर महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढू शकतो. जर डिसेंबरमध्ये AICPI-IW १४८.२ टक्के असेल तर महागाई भत्ता ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा