महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (declared) राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इतर 29 महापालिकांसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी, गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांना कोणताही अडथळा न येता आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने 2026 या वर्षासाठी यापूर्वीच 24 सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, त्या यादीत 15 जानेवारीचा समावेश नव्हता. आता महापालिका निवडणुकांसाठी विशेष बाब म्हणून ही अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाने काढलेल्या आदेशानुसार ही सुट्टी संपूर्ण राज्यासाठी नसून, केवळ निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असेल.

मुंबई शहर , मुंबई उपनगर तसेच ज्या 29 महापालिकांमध्ये मतदान होणार आहे,(declared) त्या सर्व महापालिका क्षेत्रातच ही सुट्टी लागू राहणार आहे. इतर भागांमध्ये मात्र नियमित कामकाज सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी वेळ आणि सुविधा मिळाव्यात, यासाठीच ही तरतूद करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.15 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजेपासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. या मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
या सार्वजनिक सुट्टीचा परिणाम आर्थिक व्यवहारांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(declared) विशेषतः मुंबईतील शेअर बाजार या दिवशी बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून अद्याप अधिकृत सुट्टीची घोषणा करण्यात आलेली नाही. आरबीआयच्या मुंबईसाठीच्या सुट्ट्यांच्या यादीत 15 जानेवारीचा समावेश नसल्याने बँकांचे कामकाज सुरू राहणार की बंद, याबाबत सध्या संभ्रम आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी देण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

काही कंपन्या पूर्ण दिवसाची सुट्टी देऊ शकतात, तर काही संस्था मतदानासाठी सकाळी (declared) किंवा संध्याकाळी किमान दोन तासांची सवलत देण्याची शक्यता आहे.दरम्यान, आशियातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे बजेट 74,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. इतक्या मोठ्या आर्थिक ताकदीच्या संस्थेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क नक्की बजावण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा