देशात थंडीचा कडाका बघायला मिळतोय. प्रचंड थंडी पडली आहे.(issued) उत्तरे भारतात भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा मोठा इशारा दिला. उत्तरेकडील राज्यात पारा सातत्याने घसरताना दिसतोय. उत्तरेकडे थंडी वाढल्याने राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज होता. मुंबईमध्ये सकाळच्या वेळी थंडी वाढलीये. संपूर्ण जानेवारी महिना थंडी राहण्याचा अंदाज आहे. डिसेंबरपेक्षा जानेवारी महिन्यात गारठा वाढला. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक भागात जोरदार पाऊस झाला. ज्यामुळे गारठा काही दिवस गायब होता. मात्र, पुन्हा थंडी वाढल्याचे चित्र होते. थंडीसोबतच देशातील काही भागात वायू प्रदूषणही वाढले. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. श्वसनासंबंधित अनेक गंभीर आजार निर्माण झाले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस थंडी राहणार आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सध्या राज्यातील थंडी गायब झाली.

उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान (issued) विभागाने दिला असून 17 जिल्ह्यांना थेट इशारा देण्यात आला. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात थंडी प्रचंड वाढली असून सकाळच्यावेळी पारा खाली जात आहे. पुढील काही स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच प्रचंड धुके असल्याने वाहनचालकास देखील अडचण निर्माण होत आहे.राज्यात सध्या तापमानात वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा अभाव आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यात तापमान वाढताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे आज राज्यातील काही भागातील गारठा कमी होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले.

ढगाळ वातावरणामुळे धुके आणि दव पडू शकतात, असाही एक अंदाज आहे.(issued)धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 8.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावमध्ये 9.2 तर भंडाऱ्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळच्या वेळी गारठा जास्त जाणवत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, ज्यापद्धतीने शीतलहरी राज्यात दाखल व्हायला पाहिजे, त्या तुलनेत दाखल होत नाहीत. ज्यामुळे हवामानात चढउतार हा बघायला मिळतोय.

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *