राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. (plate )एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंतच नंबरप्लेट बसवू शकत होता. दरम्यान, जर तुम्हीही अजून नंबरप्लेट बसवली नसेल तर काय होणार? कारवाई काय होणार, दंड किती असणार असे अनेक प्रश्न वाहनधारकांच्या मनात निर्माण झाला आहे.HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख डिसेंबर महिन्यात होती. या तारखेपर्यंत ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या वाहतूक विभागाने तात्पुरती कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या नवीन एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जोपर्यंत नवीन एजन्सी सक्रिय होत नाही तोपर्यंत दंज आकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. सकाळ माध्यमाने याबाबत माहिती दिली आहे.महाराष्ट्र सरकारने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याचे आदेश दिले होते. यासाठी तीन मुख्य एजन्सी नियुक्त करण्यात आल्या होत्या. आता या तिन्ही एजन्सीचे करार संपले आहे. नवीन कंत्राटदारांचा शोध सुरु आहेत. तोपर्यंत दंड आकारला जाणार नाही.

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांकडून दंड आकारला जाणार आहे. ज्यांनी नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन केले आहे परंतु अजून बसवले नाही त्यांच्याकडून १००० रुपये दंड आकारला जाईल. ज्या वाहनधारकांना ही प्रक्रिया आजिबात सुरु केली नाही त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल. अजूनही राज्यातील जवळपास लाखो वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा