तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, रस्त्यावर शांत बसलेले कुत्रे अचानक तुमच्या बाईक किंवा कारच्या मागे (dogs) भुंकत आणि धावत सुटतात. हे दृश्य इतकं सामान्य आहे की अनेकदा यामुळे अपघात होण्याची भीतीही वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, यामागे काही खास आणि मनोरंजक कारणं दडलेली आहेत? कुत्र्यांचं हे वर्तन फक्त दुश्मनीचं नाही, तर त्यांच्या जगण्याचे काही खास नियम आहेत. चला, यामागची खरी कारणं जाणून घेऊया, जी तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील !

1. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता माणसांपेक्षा खूप जास्त असते. ते दूरूनच ओळखू शकतात की त्यांच्या हद्दीतून कोण-कोण गेलं आहे. (dogs)जेव्हा तुम्ही तुमची गाडी घेऊन दुसऱ्या परिसरातून येता, तेव्हा तुमच्या गाडीच्या टायरवर त्या भागातील कुत्र्यांचा वास चिकटलेला असतो. तुमच्या हद्दीतील कुत्रे तो ‘बाहेरील वास’ ओळखतात आणि त्यांना वाटतं की त्यांच्या हद्दीत कोणीतरी अनोळखी कुत्रा आला आहे. यामुळे ते लगेच सतर्क होतात आणि आपल्या हद्दीचे रक्षण करण्यासाठी त्या गाडीचा पाठलाग करू लागतात.

2. कुत्रे अनेकदा गाडीच्या टायरवर लघवी करतात. हे केवळ योगायोग नाही, तर त्यांची एक खास भाषा आहे. असं करून ते त्या जागेवर आपली हजेरी दाखवतात. (dogs)जेव्हा दुसऱ्या ठिकाणाहून आलेली गाडी या वासावरून जाते, तेव्हा स्थानिक कुत्र्यांना कळतं की त्यांच्या इलाक्यावर दुसऱ्या कुत्र्याने कब्जा केला आहे. त्यामुळे ते आक्रमक होतात आणि त्या गाडीमागे धावत सुटतात.

3. कधीकधी हे कारण फक्त वासाचं नसतं. कुत्रे खूप संवेदनशील असतात. जर एखाद्या गाडीने त्यांच्या साथीदाराला जखमी केलं असेल किंवा मारलं असेल, तर ते ती गाडी लक्षात ठेवतात. पुढच्या वेळी तशीच गाडी दिसल्यावर ते त्या रागामुळे किंवा बदलाच्या भावनेने तिचा पाठलाग करतात.

4. कुत्रे स्थिर वस्तूंना दुर्लक्षित करतात, पण जी गोष्ट वेगाने हलते किंवा धावते, ती त्यांना एक आव्हान वाटते. (dogs) त्यांच्या शिकारी स्वभावामुळे ते वेगाने धावणाऱ्या गोष्टींचा पाठलाग करू लागतात. यामुळेच, चालत जाणाऱ्या व्यक्तीमागे ते लागत नाहीत, पण बाईक किंवा कारच्या आवाजामुळे आणि वेगामुळे ते सतर्क होतात.

अशा परिस्थितीत काय कराल?

घाबरू नका: अचानक वेग वाढवू नका, कारण यामुळे गाडीचा तोल जाऊ शकतो.

थांबा: शक्य असल्यास गाडी हळू करून काही सेकंद थांबा.

शांत रहा: जोपर्यंत तुम्ही त्यांना भडकवत नाही, तोपर्यंत कुत्रे सहसा हल्ला करत नाहीत.

ओळख निर्माण करा: जर तुम्ही रोज त्याच रस्त्याने जात असाल, तर तिथल्या कुत्र्यांशी हळूहळू जवळीक साधा. यामुळे ते तुम्हाला आणि तुमच्या गाडीला ओळखायला लागतील.

हेही वाचा :

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *