बीड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (marriage) ज्या पोलिसांवर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस दलातील एका शिपायाविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आष्टी तालुक्यातील रहिवासी आहे.(marriage) आरोपी हा पीडितेच्या घराशेजारीच वस्तीवर वास्तव्यास होता. या दरम्यान त्याने पीडितेशी संपर्क वाढवून जवळीक साधली आणि तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. पीडितेचे आई-वडील घरी नसताना, तसेच संधी मिळेल तेव्हा आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने दीर्घकाळ पीडितेचे लैंगिक शोषण केले. दरम्यानच्या काळात पीडितेने जेव्हा जेव्हा लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा तो काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करत होता.
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी संबंधित पोलिसांच्या लग्नासाठी मागे लागली होती. (marriage) मात्र आरोपीने तिला स्पष्टपणे लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. तिने थेट अंभोरा पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.(marriage) या प्रकरणाचा पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे हे करत आहेत. या घटनेमुळे पीडित तरुणीच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून रक्षकच भक्षक बनल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
DMart संक्रांती सेल! स्टील भांडी फक्त 29 रुपयांपासून
बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा
ITR च्या रिफंडसाठी एक वर्षापर्यंत पाहावी लागेल वाट