नवी मुंबईतून पोलीस दलाला हादरवणारं कृत्य समोर आलं आहे. (policeman)एका पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओनंतर पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात काम करीत होता. अनैतिक गोष्टींवर निर्बंध आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाने अशा प्रकारचं कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत असलेले (policeman) पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे यांचा कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असताना चित्रित करण्यात आलं आहे. या प्रकारानंतर मांडोळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

पोलीस उप आयुक्त सचिन बाबासाहेब गुंजाळ यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी निलंबनाचा (policeman)आदेश जारी केला असून, अनैतिक प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असताना अशा ठिकाणी उपस्थित राहणे हे खाकी वर्दीला न शोभणारे असल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे. या गंभीर घटनेनंतर पोलीस प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *