लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे.(accounts)लाडकी बहीण योजनेत आता महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे. लाडकीच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान, आता कधीही महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. उद्या मकरसंक्रांतीच्या मूहूर्तावर सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता उशिरा देण्यात आला.(accounts) त्यानंतर आता डिसेंबरचा हप्तादेखील लांबणीवर गेला आहे. जानेवारीचे १३ दिवस झाले तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. मात्र, आता महिलांना कधीही पैसे मिळू शकतात. येत्या २४ तासात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. यामुळे महिलांना उद्या डबल गिफ्ट मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. (accounts)या योजेनेत ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा मिळत नाही. याचसोबत योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ नवीन आर्थिक वर्षात बंद होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना फेब्रुवारीपर्यंत लाभ मिळू शकतो.
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्