आजकाल सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती बाकी काही नाही पण मोबाईल हातात घेतो.(involving) मोबाईल हातात घेतल्यावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लोकं फक्त त्यावर कामाच्या गोष्टी पाहतात. अन्यथा बाकी लोकं इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रोल करतात.कोणी मित्राने आपल्याला कोणतं रील पाठवलंय किंवा कोणी काही मेसेज केलाय का हे पाहण्यासाठी लोकं फोन हातात घेतात. याच सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. अशा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदा कधीच पाहिला नसेल.

सध्या जो व्हिडीओ व्हायरल झालाय तो कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालाय.(involving) या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार चालक योग्य पद्धतीने रस्त्यावरून कार चालवत होता. काही वेळी तो अगदी शांतपणे गाडी चालवत असतो. परंतु अवघ्या काही सेकंदांनंतर समोरुन चुकीच्या मार्गाने एक स्कुटीवर व्यक्ती येताना दिसतो. तो स्कुटीवर असलेल्या व्यक्ती येऊन थेट कारला धडकतो.ज्यावेळी कार आणि स्कुटची धडक होते तेव्हा तो व्यक्ती काहीसा उडतो आणि कारच्या बोनेटवर येतो. बोनेटवर आल्यानंतर तो झोपण्याची एक्टिंग करतो. जसं की बोनेट नाही एक बेड आहे असं समजून तो झोपण्याची एक्टिंग करतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या X प्लॅटफॉर्मवर अकाउंटने पोस्ट केला आहे.(involving) व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘भावाला बेड परवडत नाही, म्हणून त्याने स्कुटी खरेदी करण्याचा विचार केला.’ हा व्हिडिओ एआयने बनवलेला नसल्याचंही कमेंटमध्ये म्हटलंय.व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केलीये, शेवटी शांत झोप ही गरजेची. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, आता कदाचित मला चांगली झोप येईल. एका भयानक अपघाताचा एक अद्भुत शेवट, अशी कमेंटमही एका युझरने केलीये.

हेही वाचा :

गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका

मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात

तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *