सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात.(proved) हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी राग आणतात तर काही हसू अनावर करतात. या व्हिडिओजमधून अनेकदा समाजातील कठोर वास्तव देखील आपल्या डोळ्यासमोर आणले जाते. अशीच एक घटना अलीकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे ज्यात एका इन्फ्लुएंसरला ई-रिक्षात बसलेला व्यक्ती अश्लील इशारे करताना दिसून आला. ही घटना मुलींसोबत अधिकतर घडून येते पण यावर कुणीही आवाज उठवत नाही. व्हिडिओत मात्र इन्फ्लुएंसरने याविरोधात आवाज उठवल्याचे दिसून आले. तिने आपली बाईक थांबवतच व्यक्तीला जन्माची अद्दल घडवली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसर बाईक चालवताना दिसून येते. (proved)याचवेळी बाजूने जाणाऱ्या ई-रिक्षातून एक प्रवासी महिलेला अश्लील इशारे करतो. यानंतर महिला आपला मान राखत त्याच्या या गैरकृत्यावर त्याला अद्दल घावण्याचा निर्णय घेते आणि ई-रिक्षाला बाजूला थांबायला सांगते. महिला जाब विचारायला जाताच व्यक्ती आपण केलेल्या कृत्याला लपवण्याचा प्रयत्न करतो. तो दावा करतो की त्याने असे काहीच केले नाही ज्यावर महिला उत्तर देत म्हणते की तिच्या कॅमेरामध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. व्यक्तीला कात्रीत पकडतच ती त्याला कानशिलात लागवतानाही दिसून येते. या घटनेनंतर रस्त्यावर गर्दी जमली. दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरुण खुर्चीवर बसलेला दिसतो तर दुसरा एक माणूस त्याला मारहाण करताना दिसतो. यादरम्यान, तो तरुण हात जोडून माफी मागताना आणि आपली चूक कबूल करतानाही दिसून येतो.
युजर्स आता महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहे. (proved)अनेक महिलांसोबत अशा घटना घडतात पण याविषयी कुणीच आवाज उचलत नाही. इन्फ्लुएंसर व्यक्तीच्या चुकीकडे दुर्लक्ष न करता त्याला चांगली शिक्षा दिली ज्यामुळे पुढे जाऊन तो पुन्हा अशी चूक करणार नाही. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ऑनलाइन व्ह्यूज आणि सहानुभूती मिळवण्यासाठी फक्त रील बनवण्याऐवजी तिने स्वतःसाठी भूमिका घेतली. ती कणखर आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा गोष्टी कधीही सहन नाही केल्या पाहिजेत, त्याच्यासोबत जे घडलं त्यासाठी तो पात्र आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ताई तुम्ही बरोबर केलंत”.
हेही वाचा :
पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार
यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’
मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर