शिक्षकांच्या पगारपत्रकावर पुढील दोन दिवसांत सह्या करण्याचा निर्णय शिक्षण (payment) विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पगारपत्रकावर सह्या न करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत सरकारमार्फत अधिकाऱ्यांच्या संघटनेला बैठकीचे आश्वासन देण्यात आल्यामुळे येत्या दोन दिवसांत अधिकाऱ्यांकडून पगारपत्रकांवर सह्या केल्या जाणार आहेत.गतवर्षापासून राज्यभरात बोगस मान्यता व बोगस शालार्थ आयडीबाबत ‘एसआयटी’ मार्फत तपासणी सुरू आहे. या तपासणीमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस येत असल्यामुळे अजूनही काही महिने ही तपासणी सुरू राहणार आहे.

या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, (payment) अनेकजण निलंबित आहेत. या प्रकारांच्या तपासणीदरम्यान पगारपत्रकावर सह्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. कोणतीही शहानिशा न करता निरपराध अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाचे म्हणणे होते. पगारपत्रकावर सही केल्यामुळे कारवाई होत असेल, तर आम्ही सहीच करणार नाही, असा निर्णय या संघटनेने घेतला होता डिसेंबर महिन्यात यवतमाळ येथील एका अधिकाऱ्याला याच कारणावरून अटक केल्याने अधिकाऱ्यांनी सह्यांवर बहिष्कार टाकला होता.’एसआयटी’च्या आदेशावरून पगारपत्रकांवर सह्या करीत नसल्याचे कारण यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढे केले होते.

अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. या पद्धतीने शिक्षकांना त्रास दिला जात असेल, (payment) तर सर्व शिक्षक-शिक्षकेतर संघटना अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाहीत, असा इशाराही संघटनांमार्फत देण्यात आला होता.या प्रकाराची तीव्रता, तसेच राज्यभरातील लाखो शिक्षक-शिक्षकेतरांचे नुकसान लक्षात घेत अखेर अधिकाऱ्यांनी पगारपत्रकांवर सह्या करण्याचा निर्णय घेल्याने पुढील दोन दिवसांत या सह्या झाल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाला राज्य सरकारने बैठकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच ही बैठकदेखील होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात

युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः

ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *