‘मतदान केंद्रांत मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली असून, १०० मीटर (photo) अंतरावरच याची तपासणी करावी. पक्षाचे बूथ मतदान केंद्रापासून २०० मीटरपेक्षा कमी अंतरावर लावले जाणार नाहीत, याचे काटेकोर पालन करा.मतदान करतानाचा फोटो व्हायरल केल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल केले जातील,’ अशा सक्त सूचना पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्या. शहरात चार उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या बंदोबस्ताचे वाटप आज दुपारी करण्यात आले.

शहरातील मतदान केंद्रांबाहेर तसेच मतपेटी वाटप केंद्रांबाहेर बुधवारी (photo) सकाळपासूनच बंदोबस्त नेमला जाणार आहे. शहरातील चार विभागांमध्ये बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, प्रिया पाटील, सुवर्णा पत्की, आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांची पथके बनविण्यात आली आहेत.महासैनिक दरबार हॉल, व्ही. टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, गांधी मैदान, शहाजी कॉलेज, हॉकी स्टेडियम येथून मतपेट्यांचे वाटप होणार आहे. तसेच मतदानानंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी बंदोबस्त असेल. यासोबतच मतमोजणीसाठीही कडेकोट बंदोबस्त
मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरापासून आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास (photo)मनाई करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींचेही मोबाईल बाहेरच जमा करून घेतले जातील. मतदान करतानाच फोटो कोणी व्हायरल केल्यास आचारसंहितेचे उल्लंघन व गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या आहेत.महासैनिक दरबार हॉल, व्ही. टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, गांधी मैदान, शहाजी कॉलेज, हॉकी स्टेडियम येथून मतपेट्यांचे वाटप होणार आहे. तसेच मतदानानंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी बंदोबस्त असेल. यासोबतच मतमोजणीसाठीही कडेकोट बंदोबस्त असणार आहे.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन