अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल मोठे निर्णय घेताना दिसत आहेत.(together) हेच नाही तर त्यांनी आता गाझा शांतता बोर्ड ऑफ पीसमध्ये भारताला आमंत्रित केले. अगोदर याकरिता पाकिस्तानला आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर आता भारतालाही आमंत्रित करण्यात आले. गाझापट्टी मागील काही दिवसांपासून अशांत होती, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नाने तेथे शांतता प्रस्तापित झाली. ही समिती अमेरिका मध्यस्थीने झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे. युद्धग्रस्त प्रदेशातील पुनर्रचना, प्रशासन, गुंतवणूक आणि निधी उभारण्याचे काम करणार आहे. या मंडळाचे अध्यक्षपद अमेरिकेकडे आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मंडळाचे अध्यक्ष आहेत. या चर्चा सत्रात सुरूवातीला शांततेवर चर्चा केली जाईल.

अमेरिकेकडूनच भारताला निमंत्रण पाठवण्यात आले. (together)अमेरिकेचे निमंत्रण भारताने जर स्वीकारले तर इतर सदस्य देशांप्रमाणेच तो तीन वर्षांच्या कालावधीसाठी या मंडळाचा एक महत्वाचा भाग बनेल. पाकिस्तान देखील या मंडळाचा भाग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदस्य म्हणून कायम राहण्यासाठी प्रत्येक देशाला 1 अब्ज डॉलर्सचे योगदान द्यावे लागेल. त्यानंतरच भारत पूर्णपणे सदस्य बनेल. या पैशांचा वापर मंडळाच्या कामासाठी केला जाईल.सुरुवातीच्या तीन वर्षांच्या नियुक्तीसाठी कोणत्याही योगदानाची आवश्यकता नसणार आहे. युद्धविराम प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ही सर्व देश गाझामधील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवतील.

हमासचे निःशस्त्रीकरण आणि गाझाच्या पुनर्बांधणीचा देखील यामध्ये समावेश आहे. (together)आता अमेरिकेकडून आलेले निमंत्रण भारताकडून स्वीकारले जाणार की, नाही याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.जर भारताने जर निमंत्रण स्वीकारले तर भारत आणि पाकिस्तान एकाच मंचावर येईल. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प इराणच्या विरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर दोन्ही देशांमध्ये तवाण वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेत काही देशांवर थेट मोठा टॅरिफ लावला. भारतावरही 50 टक्के टॅरिफ अगोदरच लावण्यात आला आहे.

हेही वाचा :

आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Windows 10 आणि 11 युजर्सना अलर्ट, CERT-In चा इशारा, जाणून घ्या

यंदाच्या बजेटमधून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, जनधन खातेधारकांसाठी महत्त्वाचा बदल होणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *