सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक आणि अमेरिका यांच्यामध्ये आता (media)अधिकृतपणे एक डिल फायनल झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या टिकटॉक बॅनच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. कंपनी अमेरिकेसाठी टिकटॉक अॅपचे एक नवीन वर्जन लाँच करणार आहे. याच कारणामुळे आता टिकटॉक अॅप अमेरिकेत बॅन केल्या जाण्याच्या चर्चा अखेर संपल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील सरकार राष्ट्रीय सुरक्षेबाबत टिकटॉक अॅपवर अनेक प्रश्न उपस्थित करत होती. अशातच टिकटॉक अॅपने अमेरिकेसाठी नवीन वर्जन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडिया अॅप टिकटॉकने सांगितले आहे की, कंपनीने (media)अमेरिकेत आपला व्यवसाय चालवण्यासाठी नवीन संयुक्त कंपनी जॉइंट व्हेंचर तयार केली आहे. या कंपनीमध्ये बहुसंख्य मालकी अमेरिकन भागीदारांची असणार आहे. हा निर्णय टिकटॉकच्या चिनी मालकीमुळे लागू होऊ शकणाऱ्या बंदीपासून वाचण्यासाठी घेण्यात आला असल्याचे सांगितलं जात आहे. या नव्या कंपनीचे नाव “टिकटॉक यूएसडीएस जॉइंट व्हेंचर एलएलसी ” असे आहे. ही कंपनी 20 कोटींपेक्षा जास्त अमेरिकन युजर्स आणि सुमारे 75 लाख व्यवसायांना सेवा देणार आहे. टिकटॉकने अमेरिकेत टिकून राहण्यासाठी अमेरिकन भागीदारीचा मार्ग निवडला आहे.
टिकटॉकने ओरॅकल, सिल्व्हर लेक आणि एमजीएक्स सारख्या मोठ्या (media)गुंतवणूकदारांसोबत करार केला आहे. या सर्व कंपन्यांच्या सहयोगाने एक टिकटॉक यूएस जॉइंट वेंचर तयार करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणं आहे की, टिकटॉकचे नवीन वर्जन पूर्णपणे वेगळ्या संरचनेवर काम करणार आहे. यामध्ये अमेरिकेतील यूजर्ससाठी खास सुरक्षा उपाय दिले जाणार आहेत. यूजर डेटा, कंटेंट आणि टेक्नोलॉजी पूर्णपणे सुरक्षित राहावी, असा या डिलचा उद्देश आहे.टिकटॉकने दिलेल्या माहितीनुसार, अॅपचे नवीन वर्जन स्पष्ट सुरक्षा मानकांतर्गत काम करणार आहे. यामध्ये यूजर डेटाची मजबूत सुरक्षा, एल्गोरिदमवर देखरेख, कंटेंट मॉडरेशन आणि सॉफ्टवेअरसोबत मजबूत हमी समाविष्ट केल्या जातील. कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, अमेरिकेतील यूजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.
नवीन टिकटॉक यूएसडीएस जॉइंट व्हेंचरची कमान एडम प्रेसर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एडम प्रेसर यापूर्वी टिकटॉकमध्ये हेड ऑफ ऑपरेशंस आणि ट्रस्ट एंड सेफ्टीची जबाबदारी सांभाळत होते. आता ते या नव्या प्लॅटफॉर्मचे सिईओ असणार आहेत. त्यांच्यासोबत सात सदस्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काम करणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त अमेरिकेतील सदस्य असणार आहेत. टिकटॉकचे सध्याचे सीईओ शौ चिउ यांचाही या मंडळात समावेश असेल, जे कंपनी आणि नवीन उपक्रम यांच्यात समन्वय राखतील.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत