सध्या WhatsApp हाच सगळ्यांचा महत्वाचा आणि आवश्यक पुरावा बनला आहे.(updated) याचा वापर खेड्यापाड्यापासून मोठ-मोठ्या व्यक्तींपर्यंत करोडोंच्या संख्येने होत असतो. तसेच युजर्सच्या गरजेनुसार यामध्ये सातत्याने बदल केले जातात. ज्याने प्रत्येकाला हव्या तश्या पद्धतीने याचा वापर करता येतो. पुढील लेखात आपण नव्या वर्षात WhatsAppमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत.WhatsAppमध्ये तुम्हाला चॅटींग करता येते, व्हाइस कॉल, व्हिडीओ कॉल करता येतो. ग्रूप मिटींग करता येते. तसेच महत्वाचे प्रोजेक्ट आपण स्क्रीन शेअर करुन दाखवू शकतो. आता WhatsAppने सगळ्यांना आवडाऱ्या फिचर म्हणजेच GIFsमध्ये बदल करण्याचा विचार केला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

GIFs पाठवणं सध्या तरुणाईचं आवडतं काम झालं आहे.(updated) आता यामध्ये GIFs पाठवण्यापासून ते डिस्प्ले होण्यापर्यंत सगळेच बदल होणार आहेत. हा बदल १ जूनपासून होणार आहे. GIF चा अर्थ म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मट असा असतो. यामध्ये स्टेटिक इमेज आणि शॉर्ट, लूपिंग आणि साउंडलेस अॅनिमेशन होतं. याने तयार केलेले इमेज लोक चॅटींगमध्ये वापरतात.

आतापर्यंत Tenor कंपनी व्हॉट्सअॅपला GIF बनवून देत होती. (updated)मात्र आता ही कंपनी त्यांची सेवा बंद करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप ला नवीन Klipy कंपनी यापुढे साथ देणार आहे. ही सुविधा जून महिन्यापर्यंत सुरु होणार आहे. मात्र ३० दिवस याची चाचणी होईल मग ते युजर्सपर्यंत पोहोचेल. यामध्ये GIFची जागा तीन कॉलममध्ये असणार आहे. जे सहज चॅट करताना दिसेल. या फिचरसाठी अनेक युजर्स उत्साही आहेत.

हेही वाचा :

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…

झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ

कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *