मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.(installment)या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. निवडणुकीमुळे बँक खात्यात पैसे येण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. आता जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, याबाबत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकींची तयारी सुरू झाली आहे.

या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.(installment) या निवडणुकीच्या मतदानाआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता केला जाऊ शकतो. याआधी महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीआधी पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.
ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश? तत्पूर्वी, काही महिलांचे योजनेचे लाभ अलीकडे बंद(installment) करण्यात आलेत. काही महिलांनी ई-केवायसी करताना प्रश्न नीट न समजल्याने चुकीची माहिती भरली होती. त्यानंतर प्रशासनाने या महिलांना अपात्र ठरवलं होतं. मात्र, आता अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. या माध्यमातून त्यांना चूक सुधारण्याची एक संधी मिळणार आहे. त्यानंतर काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आरसीबी आयपीएल टीम अदर पुनावाला खरेदी करणार?
या महिलेवर जीव ओवाळून टाकतात पुतिन, देते थेट आदेश
QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर