मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2026 साठी प्रबळ दावेदार मानलं जात (most experienced) असताना, संघातील सर्वात अनुभवी खेळाडू रोहित शर्मा याच्या भूमिकेबाबत मोठं चित्र स्पष्ट झालं आहे. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सांगितलं की, यंदाच्या हंगामात रोहित ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून नव्हे, तर पूर्णवेळ मैदानात दिसणार आहे.

गेल्या हंगामात फिटनेसच्या (most experienced) कारणामुळे रोहितला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरलं गेलं होतं. त्या वेळी त्याच्या वर्कलोडचं व्यवस्थापन करणं गरजेचं होतं. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. रोहितने ऑफ-सीझनमध्ये फिटनेस आणि फलंदाजीवर विशेष मेहनत घेतली असून त्याचे सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अलीकडेच संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो शार्दुल ठाकुर यांच्या गोलंदाजीवर मोठा षटकार मारताना दिसला, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
महेला जयवर्धने यांनी स्पष्ट केलं की, यंदा रोहित मैदानात सक्रिय राहील, क्षेत्ररक्षण करेल आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करेल. संघाच्या संतुलनानुसार त्याची भूमिका ठरवली जाईल, पण त्याचा अनुभव आणि उपस्थिती संघासाठी अत्यंत महत्त्वाची असेल.
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी खेळाडू आणि माजी कर्णधार (most experienced) आहे. त्याने 2011 पासून संघाचं प्रतिनिधित्व करताना संघाला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. आयपीएल कारकिर्दीत त्याने 272 सामन्यांत 7000 हून अधिक धावा करत स्वतःची छाप पाडली आहे. त्यामुळे आगामी हंगामातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
आता फिट आणि पूर्णवेळ मैदानात दिसणारा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाच्या स्वप्नाला किती बळ देतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज