महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषता साजरा केला जातो. ठिकठिकाणी उंच दहीहांडी बांधून मानवी मनोरे रचून या दहीहंडी फोडल्या जातात. तर, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोकुळाष्टमीच्या दिवशी मानवी मनोरे रचून पारंपारिक पद्धतीने दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. मात्र, महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे अत्यंत थरारक पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते. खोल विहिरीवर बाधलेली उंच दहीहंडी उडी मारुन फोडली जाते. प्रत्यक्षात हे पाहताना अंगावर काटा येतो.

अलिबागच्या कुर्डुस गावात आगळी वेगळी दहीहंडी साजरी करण्यात येते. इथे विहिरीवर उंच दहिहंडी बांधून ती फोडण्याची गेल्या 30 वर्षांपासूनची परंपरा आहे. याला विहिरीवरची दहीहंडी म्हणतात. गावातील गोविंदा पथकं विहिरीच्या कठड्यावरून उडी मारून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. 1992 साली कुर्डूस गावातील देऊळआळी परिसरातील पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे आणि केणी या कुटुंबातील धाडसी तरुणांनी काहीतरी वेगळं करावं अस वाटल. यातूनच या तरुणांना विहिरीवर दहीहंडी फोडण्याची भन्नाट करण्याची कल्पना सुचली. त्यांची ही भन्नाट कल्पना परंपरा बनली आहे.
सुरुवातीला सिताफळीच्या झाडाचा आधार घेत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न झाला, पण नंतर विहिरीच्या कठड्यावर थर रचून त्यावरून उडी मारून दहीहंडीला स्पर्श करण्याची पद्धत रूढ झाली. या दहीहंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गोविंदाने दहीहंडीला हात लावला की ती फुटली असे मानले जाते. म्हणजे प्रत्यक्षात ही दहीहंडी फोडली जात नाही तर तिला फक्त स्पर्श केला जातो. यांनतर ही दहीहंडी खाली उतरवून विहिरीत फोडली जाते. गोविंद पथकातील सर्व सदस्य विहिरीत उडी मारून जल्लोष साजरा करतात. विशेष म्हणजे, या थरारात आजवर कोणालाही दुखापत झाली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
हेही वाचा :
धोक्याची रात्र! हवामान विभागाचा हाय अलर्ट….
सुप्रियाला पाहून सचिनच्या आईचे मन जिंकले; केली अनपेक्षित मागणी
राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला