मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर तणाव (development) वाढलेला असताना भारतासाठी संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक ठरत असताना भारतानेही याच दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे.

इस्रायलमधील AI-आधारित (development) रोबोटिक्स क्षेत्रात आघाडीवर असलेली XTEND आणि भारतातील Rayonix Tech या कंपनीदरम्यान सुमारे 11 मिलियन डॉलरचा करार झाला आहे. या कराराअंतर्गत भारतातच अत्याधुनिक अनमॅन्ड एरिअल व्हेईकल्स (UAVs) म्हणजेच ड्रोनची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे हे ड्रोन पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे ऑपरेट केले जाणार असून, भविष्यातील युद्धांसाठी ते अत्यंत प्रभावी मानले जात आहेत.

सध्या जगभरात युद्धाची पद्धत झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक शस्त्रांपेक्षा ड्रोन, (development) सायबर तंत्रज्ञान आणि AI-आधारित प्रणाली यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अमेरिका आणि इस्रायलसारखे देश आधीपासूनच या तंत्रज्ञानात पुढे आहेत, तर इराणनेही आपल्या क्षमतेनुसार प्रत्युत्तर देत या तंत्रज्ञानाची ताकद दाखवून दिली आहे.या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेलं हे पाऊल अत्यंत धोरणात्मक मानलं जात आहे. भारतातच ड्रोन निर्मिती झाल्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असून, संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला चालना मिळणार आहे. तसेच, भविष्यातील युद्धांमध्ये भारताची तयारी अधिक मजबूत होईल.

या करारामुळे (development) दक्षिण आशियातील सामरिक समतोलावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पाकिस्तान आणि चीन यांच्यासाठी हा एक मोठा धोरणात्मक इशारा मानला जात आहे. कारण AI-आधारित ड्रोन तंत्रज्ञानामुळे युद्धातील अचूकता, वेग आणि प्रभावीपणा अनेक पटींनी वाढतो.एकंदरीत, मध्यपूर्वेतील संघर्षाने जगाला आधुनिक युद्धाची नवी दिशा दाखवली असताना, भारताने वेळेत घेतलेला हा निर्णय भविष्यातील सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

हेही वाचा :

ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *