लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. (women)आता फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत काही महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना ४५०० रुपये मिळणार आहे. तीन हप्त्यांचे रखडलेले पैसे एकत्र येणार आहेत. यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार हे जाणून घ्या.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा लाभ सुरु आहे. त्यांना यापुढेही (women)योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व निकषात पात्र महिलांना लाभ दिला जातो. त्यांचा लाभ यापुढेही असाच सुरु राहणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना ४५०० रुपये दिले जाणार आहेत. ३ महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. केवायसीमध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यातील पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे
अनेक महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता दिलेला नाही. (women)काही त्रुटींमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. दरम्यान, प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरलेल्या महिलांना तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली असेल आणि निकषात बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार