क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ करणारा निर्णय मेरिलबोन क्रिकेट क्लबने (rules)जाहीर केला आहे. 2022 नंतर प्रथमच क्रिकेटच्या नियमांमध्ये व्यापक सुधारणा करत तब्बल 73 नियम बदलण्यात आले असून हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. कसोटी क्रिकेटपासून क्लब क्रिकेटपर्यंत या बदलांचा थेट परिणाम दिसून येणार असून खेळाची गती, न्यायनिवाडा आणि पारदर्शकता वाढवण्याचा उद्देश या सुधारण्यांमागे आहे.या बदलांमध्ये दिवसाचा शेवटचा ओव्हर, ‘डेड बॉल’ची व्याख्या, ओव्हरथ्रो, हिट विकेट, बॅट आणि बॉलचे मानक अशा अनेक बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कसोटी सामन्यांत दिवसाच्या अखेरीस खेळ थांबवण्याबाबत असलेला जुना नियम आता बदलण्यात आला आहे, ज्यामुळे खेळाची रोमांचकता टिकून राहणार आहे.

आता कसोटी सामन्यात दिवसाचा शेवटचा ओव्हर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण (rules)करणे बंधनकारक असेल. याआधी शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट पडल्यास उर्वरित चेंडू न खेळता खेळ थांबवला जात होता. मात्र, नव्या नियमानुसार विकेट पडली तरी उर्वरित चेंडू खेळले जातील. यामुळे नव्या फलंदाजाला कठीण परिस्थिती टाळण्याची संधी मिळणार नाही आणि खेळ अधिक स्पर्धात्मक राहील, असे एमसीसीचे मत आहे.या निर्णयामुळे विशेषतः कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या सत्रातील उत्कंठा अधिक वाढण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांसाठीही हा बदल अधिक थरारक अनुभव देणारा ठरणार आहे.

ओव्हरथ्रो आणि मिसफील्ड यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. (rules)फील्डरने विकेटवर थ्रो करताना चेंडू पुढे गेला तरच तो ओव्हरथ्रो मानला जाईल; मात्र बाउंड्रीजवळ चेंडू अडवताना हातातून निसटला तर तो मिसफील्ड समजला जाईल. तसेच, ‘डेड बॉल’ घोषित करण्यासाठी आता चेंडू विकेटकीपर किंवा गोलंदाजाकडे असणे आवश्यक राहिलेले नाही. चेंडू मैदानात थांबला असेल किंवा धाव शक्य नसल्याचे अंपायरला वाटले, तर तो थेट डेड बॉल घोषित करू शकतो.याशिवाय, लॅमिनेटेड बॅटला क्लब क्रिकेटमध्ये सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. दोन किंवा तीन तुकडे जोडून तयार केलेले हे बॅट पारंपरिक सिंगल-पीस बॅटपेक्षा स्वस्त असल्याने ओपन एज क्लब क्रिकेटमध्ये त्यांचा वापर करता येणार आहे. हिट विकेट नियमही अधिक स्पष्ट करण्यात आला असून शॉट खेळल्यानंतर तोल जात स्टंप्सवर पडल्यास फलंदाज आउट ठरेल, जरी चेंडू दूर गेला असला तरीही.

महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी बॉलचे तीन वेगवेगळे साइज निश्चित करण्यात आले आहेत. पुरुष क्रिकेटसाठी सध्याचा बॉल कायम राहणार असून, महिला व मोठ्या वयाच्या ज्युनियर खेळाडूंकरिता साइज-2, तर लहान वयाच्या ज्युनियर खेळाडूंकरिता साइज-3 बॉल वापरला जाणार आहे. वजन व आकार वेगळा असला तरी गुणवत्ता, सुरक्षितता आणि मजबुतीचे नियम सर्व बॉल्ससाठी समान राहणार आहेत.एमसीसी ही क्रिकेटचे नियम बनवणारी जगातील सर्वोच्च संस्था असून 1787 मध्ये तिची स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अस्तित्वात आल्यानंतरही नियम बनवण्याचा अधिकार आजही एमसीसीकडेच आहे. त्यामुळे 73 नियमांतील हे बदल जागतिक क्रिकेटवर दीर्घकालीन प्रभाव टाकणार असल्याचे स्पष्ट आहे.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *