Kolkata Knight Riders साठी आयपीएल 2026 स्पर्धेआधीची तयारी धक्क्यांनी (IPL 2026 tournament) भरलेली ठरत आहे. मिनी लिलावात मोठ्या मेहनतीने संघाची बांधणी केल्यानंतर आता एकामागोमाग एक प्रमुख वेगवान गोलंदाज संघाबाहेर जात असल्याने संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.सुरुवात झाली ती Mustafizur Rahman याच्या बाहेर पडण्याने. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज Blessing Muzarabani याची निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच आणखी एक मोठा धक्का बसला.

भारताचा युवा वेगवान गोलंदाज Harshit Rana दुखापतीमुळे पूर्ण स्पर्धेला मुकणार (IPL 2026 tournament) असल्याचं स्पष्ट झालं. टी20 वर्ल्डकपपूर्व सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी तो अजून पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे संघाच्या प्लॅनिंगवर परिणाम झाला आहे.यातून सावरण्याआधीच आणखी एक धक्का बसला तो Akash Deep याच्या अनुपस्थितीमुळे. पाठीत झालेल्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो सध्या बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये रिहॅब करत आहे. त्यामुळे तो आयपीएल 2026 मध्ये खेळू शकणार नाही. कोलकात्याने त्याला लिलावात 1 कोटी रुपयांना घेतलं होतं, पण आता त्याची सेवा मिळणार नसल्याने संघाला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, (IPL 2026 tournament) श्रीलंकेचा स्टार पेसर Matheesha Pathirana याच्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. टी20 वर्ल्डकपदरम्यान झालेल्या दुखापतीतून तो अजून पूर्णपणे सावरलेला नाही. फिटनेस टेस्ट पास न केल्यास त्याला आयपीएल खेळण्याची परवानगी मिळणार नाही, असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तो स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तरी उपलब्ध नसणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
एकूणच पाहता, कोलकाता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजीचा कणा स्पर्धेआधीच खिळखिळा झाला आहे. तीन प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याने संघ व्यवस्थापन आता पर्यायी खेळाडूंच्या शोधात आहे. आगामी काही दिवसांत कोणाला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज