मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, उद्दिष्टे आणि हिंदू धर्माच्या संकल्पनेवर सविस्तर भाष्य केले. संघाचे कार्य जगात अनोखे असून समाजाला संघटित करणे हेच संघाचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भागवत म्हणाले की, संघाला कोणत्याही प्रकारची सत्ता, ताकद किंवा लोकप्रियता नको आहे. संघ कोणाशीही स्पर्धा करत नाही किंवा कोणाचा विरोध करत नाही. देशाच्या भल्यासाठी जे काम होत आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी संघ समाजात आपुलकीच्या भावनेने कार्य करतो. संघात व्यवहार नसून नातेसंबंध आणि समर्पणाच्या भावनेतून काम केले जाते, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना (Rashtriya Swayamsevak Sangh) मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, मोदी यांचा स्वतःचा राजकीय पक्ष आहे आणि तो संघापासून वेगळा आहे. संघ आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट करत त्यांनी संघाची भूमिका केवळ सामाजिक असल्याचे अधोरेखित केले.
हिंदू धर्मावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, भारताचा सनातन स्वभाव कधीही बदलणार नाही. ऋषी-मुनींनी दिलेल्या विचारांनुसार सगळे आपलेच आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हीच भारतीय परंपरा आहे. कोणालाही मागे सोडायचे नाही, हा हिंदू धर्माचा मूलभूत संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. सृष्टीच्या उत्पत्तीपासून धर्म अस्तित्वात असून तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मतही त्यांनी मांडले.
भारत भविष्यात विश्वगुरू बनेल, असा विश्वास व्यक्त करताना भागवत (Rashtriya Swayamsevak Sangh) यांनी भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन हे देखील भारताचेच असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी हिंदू समाजाचे चार प्रकार सांगत अभिमानी हिंदू, उदासीन हिंदू, खाजगी पातळीवर हिंदू ओळख मानणारा आणि आपली हिंदू ओळख विसरलेला किंवा विसरायला भाग पाडलेला हिंदू, असे वर्गीकरण मांडले. समाजाने आत्मभान जागे ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार