मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. (prices) वाहनधारक आणि गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस महागणार आहे.महानगर गॅस लिमिटेडने CNG आणि PNG च्या दरात वाढ जाहीर केली आहे. CNG च्या दरात प्रति किलो 50 पैशांची तर PNG च्या दरात 1 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरानुसार CNG ८१ रुपये प्रति किलो आणि PNG ५० रुपये प्रति युनिट झाला आहे.

सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरवाढीचा परिणाम रिक्षा, टॅक्सी (prices) आणि बस प्रवाशांबरोबरच घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. दरवाढीनंतरही CNG पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त पर्याय असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटला धक्का लागणार असल्याचे दिसत आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप जास्त वाढत आहेत. (prices) त्यामुळेच अनेकांनी सीएनजी वाहने घेतली आहेत. सीएनजीचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. मात्र, आता हे दरदेखील सतत वाढताना दिसत आहे. याचसोबत पीएनजी गॅसच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. पीएनजी गॅस हा घराघरात वापरला जातो. या किंमती वाढल्याने महिलांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र फार काही बदल झालेला दिसत नाहीये. आज मुंबईत १ लिटर पेट्रोल १०३.५० रुपयांना विकले जात आहे तर १ लिटर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७७ रुपये तर डिझेलची किंमत ८७.६७ रुपये आहे. या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *