शरीराला पाण्याची खूप गरज असते. दिवसाला २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते.(drinking)पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे कोणतेही आजार होत नाही. मात्र, जर तुम्हाला पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान लागत असेल तर त्यामागे काही कारणे असू शकतात. पाणी प्यायल्यावर तुमची तहान भागायला हवी. परंतु असं होत नसेल तर तुमच्या शरीरात काही बदल होत असतील.अनेकदा पाणी प्यायल्यानंतर जर तहान भागत नसेल तर यामागे बदलते हवामान, घाम किंवा थकवा ही कारणे असू शकतात.परंतु हे सारखे होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवे.

जर तुम्हाला वारंवार लघवी येत असेल, तोंड सुकत असेल याचसोबत (drinking) थकवा जाणवत असेल तर याकडे आजिबात दुर्लक्ष करु नका. यामुळे आजार होऊ शकतात.वारंवार तहान लागण्याचे मुख्य कारण असू शकते डायबिटीज मेलिटस. शरीरात जास्त प्रमाणात रक्त वाढल्याने पाणी बाहेर पडते. यामुळे तहान लागते. याचसोबत डायबिटीज इन्सिपिडसमध्ये होर्मोन्सची कमी असल्यानंतरही सारखी तहान लागू शकते.
तहान लागण्यामागे डिहायड्रेशनदेखील एक कारण असू शकते. (drinking)यामध्ये उलटी किंवा जास्त घाम येतो. याचसोबत किडनीचा त्रास असेल तेव्हादेखील शरीरात पाण्याची कमी असते. त्यामुळे तहान लागते. थायरॉइडमध्येदेखील काही गोळ्यांच्या परिणामांमुळे वारंवार तहान लागू शकते.या आजारांपासून वाचण्यासाठी तुम्हाला मोजकेच पाणी प्यायला हवे. दिवसभरात थोड्या-थोड्या अंतराने पाणी प्यायला हवे. जास्त गोड आणि कॉफीयुक्त पदार्थ खाऊ नका. आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार