अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र होत असतानाच (suffers)आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ दिसू लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर रशियाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि चीनचा पाठिंबा यामुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे.अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असून ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या अणुऊर्जा धोरणाबाबत करार करण्यासाठी १० ते १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही अंतिम मुदत संपल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान अमेरिकेने यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या दोन विमानवाहू युद्धनौका मध्यपूर्वेत तैनात केल्या आहेत.

या हालचालींमुळे परिसरातील तणाव आणखी वाढला आहे. (suffers)इराणकडूनही लष्करी तयारीला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला की, इराणवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणविरोधातील कारवाई म्हणजे आगीशी खेळ ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. रशियाच्या या भूमिकेला चीनकडूनही समर्थन देण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिका एकाकी पडू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तणावाच्या या वातावरणात इराण आणि रशिया यांनी संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. (suffers) ओमानची खाडी आणि हिंद महासागर परिसरात दोन्ही देशांचे सैन्य उतरले असून हा युद्धाभ्यास महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने रशियासोबत सराव सुरू करणे हे स्पष्ट संदेश देणारे पाऊल मानले जात आहे.

इराणी लष्कराच्या संकेतस्थळाचा हवाला देत सांगितले की, या सरावात इराणची अल्वंद विध्वंसक युद्धनौका, क्षेपणास्त्र डागणाऱ्या नौका, लढाऊ विमाने आणि लँडिंग क्राफ्ट सहभागी आहेत. रशियाची विशेष लढाऊ तुकडीही या मोहिमेत सहभागी झाली आहे. दुसरीकडे काही वृत्तवाहिन्यांच्या अहवालानुसार अमेरिका आठवड्याच्या अखेरीस इराणवर हल्ल्याच्या तयारीत आहे आणि मध्यपूर्वेत आपले सैन्यबळ मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी संघर्ष भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र इराणला रशिया आणि चीनचा पाठिंबा मिळाल्याने ट्रम्प प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत मित्रांकडून मित्राची निर्घृण हत्या; वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून टोकाचा निर्णय

मधुचंद्राच्या रात्री रोमान्स करत होतं नवविवाहित जोडपं, चुकून व्हिडिओ झाला लाइव्ह, सोशल मीडियावर व्हायरल

सावधान! १ एप्रिलपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार; तुमच्यावर काय परिणाम?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *