सध्या भाजी वाल्यापासून ते विमान प्रवासापर्यंत सगळीकडेच ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते.(payments)ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक बॅंकांचे आणि इतर डिजीटल पेमेंट्स अॅप वापरले जातात. जर तुम्ही PhonePe युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. तुम्हाला आता UPI व्यवहारांसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची सुविधा सुरू केली आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते आता UPI PIN टाकण्याऐवजी थेट फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनच्या मदतीने पेमेंट करू शकणार आहेत. यामुळे पैसे मोबाईलमधून जाण्याचा धोका किंवा सायबर स्कॅमच्या समस्या नक्कीच कमी होतील, अशी आशा आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा सध्या ₹5,000 पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच लहान रकमेच्या पेमेंटसाठी आता प्रत्येक वेळी PIN लक्षात ठेवण्याची किंवा टाकण्याची गरज भासणार नाही. जर सेन्सरची अडचण किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे बायोमेट्रिक काम करत नसेल, तर वापरकर्ते नेहमीप्रमाणे UPI PIN वापरून व्यवहार पूर्ण करू शकतात.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फीचर वापरकर्त्यांचा पेमेंट अनुभव जास्त (payments)सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यवहार करताना PIN पाहिले जाण्याचा धोका टाळण्यासाठीही ही सुविधा फायद्याची ठरणार आहे.PhonePe चे हेड ऑफ पेमेंट्स दीप अग्रवाल यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंट अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित बनवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमुळे व्यवहार फ्रिक्शनलेस होतील आणि हार्डवेअर-लेव्हल सिक्युरिटी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या ही सुविधा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि फिंगरप्रिंट (payments)तसेच फेस रिकग्निशन दोन्ही सपोर्ट करते. लवकरच iOS वापरकर्त्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.ही सुविधा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम PhonePe अ‍ॅप उघडा. त्यानंतर प्रोफाइलमध्ये जाऊन ‘Manage Payments’ हा पर्याय निवडा. पुढे ‘Biometric Pay’ आयकॉनवर टॅप करून संबंधित बँक खात्यासाठी UPI बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करा. एकदा सेटअप करताना UPI PIN आणि बायोमेट्रिकची पुष्टी करावी लागेल. त्यानंतर भविष्यातील व्यवहारांसाठी थेट बायोमेट्रिकचा वापर करता येईल.

हेही वाचा :

इचलकरंजीत मित्रांकडून मित्राची निर्घृण हत्या; वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून टोकाचा निर्णय

मधुचंद्राच्या रात्री रोमान्स करत होतं नवविवाहित जोडपं, चुकून व्हिडिओ झाला लाइव्ह, सोशल मीडियावर व्हायरल

सावधान! १ एप्रिलपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार; तुमच्यावर काय परिणाम?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *