इचलकरंजी शहरात प्रतिबंधित इंजेक्शनच्या गैरवापराचे धक्कादायक(Dangerous)वास्तव समोर आले असून, हा प्रकार केवळ नशेखोरीपुरता मर्यादित न राहता व्यायाम, बॉडीबिल्डिंग, ॲथलेटिक्स आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सर्रास केला जात असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या तीन मोठ्या कारवाया आणि मागील महिन्यातील दोन धडक कारवायांमुळे हे भयावह चित्र स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात इचलकरंजी हे शहर प्रतिबंधित इंजेक्शन नशेखोरीच्या बाबतीत टोकाला पोहोचल्याचे या कारवायांमधून समोर आले आहे.मेफेन्टर्मिन सल्फेटसारखी इंजेक्शन्स वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत मर्यादित प्रमाणात वापरण्यात येतात. मात्र, शहरात या इंजेक्शनचा वापर नशेसाठी तसेच ताकद, सहनशक्ती आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेषतः व्यायामशाळांमध्ये नियमित जाणारे तरुण तसेच धावणे, बॉडीबिल्डिंग आणि इतर क्रीडा प्रकारांत सक्रिय असलेले युवक या इंजेक्शनच्या विळख्यात अडकत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांत इचलकरंजी शहरात प्रतिबंधित इंजेक्शनविरोधात (Dangerous)सलग तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, केवळ मागील महिनाभरात दोन धडक कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये तब्बल २१९ नशिल्या इंजेक्शनच्या बाटल्या, दुचाकी, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यावरून शहरात नशेचे जाळे किती खोलवर आणि संघटित पद्धतीने पसरले आहे, हे स्पष्ट झाले आहे.या नशेखोरीचा परिणाम थेट तरुणाई आणि क्रीडा क्षेत्रावर होत आहे. कामगिरी वाढवण्यासाठी घेतली जाणारी ही प्रतिबंधित इंजेक्शन्स दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असून, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, मानसिक असंतुलन, तीव्र व्यसनाधीनता आणि अचानक मृत्यूचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. नशेच्या आहारी गेलेली तरुणाई पुढे गुन्हेगारीकडे वळत असल्याचेही चिंताजनक चित्र आहे.

तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून, सुरुवातीला नशेसाठी (Dangerous)इंजेक्शन वापरणारे तरुण पुढे याच व्यसनातून थेट इंजेक्शन तस्करीकडे वळत आहेत. या माध्यमातून अवैध व्यवसायाची छुपी साखळी तयार होत असून, आर्थिक काळाबाजार उभा राहत आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही मोठ्या कारवायांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले असून, तपासाची व्याप्ती वाढताच नवनवी नावे समोर येत आहेत. त्यामुळे नशेचे जाळे अपेक्षेपेक्षा अधिक भयावह असल्याचे स्पष्ट झाले आहे.पहिल्या कारवाईदरम्यान सखोल चौकशीत प्रतिबंधित इंजेक्शन पुरवठ्याचे कनेक्शन थेट दिल्लीपर्यंत असल्याचे उघड झाले होते. मात्र, त्या दिशेने ठोस तपास न झाल्याने एकही मुख्य संशयित हाती लागलेला नाही.

उर्वरित कारवायांमध्येही गुन्हेगार एकाच टोळीतील असल्याने दिल्ली कनेक्शन(Dangerous) पुन्हा समोर आले, तरीही सखोल तपासाअभावी ही साखळी अद्याप तुटलेली नाही. दिल्ली कनेक्शनवर ठोस कारवाई झाली नाही, तर इचलकरंजीतील तपास कायमच अपुरा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, नशेच्या इंजेक्शनची खरेदी-विक्री आता ऑनलाईन माध्यमातून होत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. विविध ऑनलाईन ॲप्सवर बनावट नाव-पत्त्यांवर अकाऊंट तयार करून, स्वतःचा मोबाईल नंबर देत व्यवहार केले जात आहेत. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी शहराबाहेरील निर्जन ठिकाणी डिलिव्हरी दिली जात असून, यामुळे नशा तस्करीचे सायबर जाळे अधिकच धोकादायक बनले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित इंजेक्शनविरोधात कठोर आणि समन्वयित कारवाईची गरज अधिक तीव्रपणे अधोरेखित होत आहे.

हेही वाचा :

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन

अँड्रॉइड फोनमध्ये ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, तुमचा फोन चालेल एकदम फास्ट

स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *