मार्च महिना सुरू होताच शाळा, कॉलेज तसेच नोकरदार वर्गासाठी सुट्ट्यांची (festivals)आनंदवार्ता आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार याच महिन्यात नववर्षाची सुरुवात होत असून सण-उत्सवांची मोठी मालिका पाहायला मिळणार आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीपासून सुरू होणारा हा महिना पुढील त्रयोदशीपर्यंत सणांनी गजबजलेला असेल.

१ मार्च २०२६ रविवार – प्रदोष व्रत
भगवान शंकराच्या पूजेचा विशेष दिवस.

२ मार्च २०२६ सोमवार – होळी
रंगांचा सण आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा उत्सव.

३ मार्च २०२६ मंगळवार – धूलिवंदन, चंद्रग्रहण
होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.(festivals) याच दिवशी चंद्रग्रहण आहे.

४ मार्च २०२६ बुधवार – होळी, चैत्र महिन्याची सुरुवात, हिंदू नववर्ष
चैत्र महिन्याची सुरुवात आणि हिंदू नववर्षाचा प्रारंभ.

६ मार्च २०२६ शुक्रवार – संकष्टी चतुर्थी
भगवान गणपतीच्या उपासनेचा दिवस.

८ मार्च २०२६ रविवार – जागतिक महिला दिन, रंगपंचमी
महिलांच्या सन्मानाचा दिवस तसेच रंगपंचमीचा उत्सव.

११ मार्च २०२६ बुधवार – शीतला अष्टमी, कालाष्टमी
देवी शीतला आणि भगवान भैरव यांची पूजा केली जाते.

१५ मार्च २०२६ रविवार – पापमोचनी एकादशी
भगवान विष्णूच्या भक्तांसाठी महत्त्वाचा उपवासाचा दिवस.

१६ मार्च २०२६ सोमवार – प्रदोष व्रत
शंकराची आराधना करण्याचा दिवस.

१७ मार्च २०२६ मंगळवार – मासिक शिवरात्री
दर महिन्याला येणारी शिवरात्री.

१८ मार्च २०२६ बुधवार – दर्श अमावस्या
अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते.

१९ मार्च २०२६ गुरुवार – गुढीपाडवा (festivals)आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात
मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि नवरात्री उत्सवाची सुरुवात.

२२ मार्च २०२६ रविवार – विनायक चतुर्थी
गणपतीची पूजा करण्याचा दिवस.

२६ मार्च २०२६ गुरुवार – राम नवमी
भगवान रामांचा जन्मोत्सव.

२९ मार्च २०२६ गुरुवार – कामदा एकादशी
विष्णूभक्तांसाठी महत्त्वाचा उपवास.

३१ मार्च २०२६ मंगळवार – महावीर जयंती
भगवान महावीरांचा जन्मदिन.

मार्च २०२६ मध्ये दोन प्रमुख राष्ट्रीय किंवा धार्मिक सुट्ट्या असतील. याशिवाय पाच रविवार आणि चार शनिवार येत आहेत. काही संस्थांमध्ये शनिवारीही सुट्टी असू शकते. तसेच काही ठिकाणी १९ मार्चला गुढीपाडव्याची आणि ३१ मार्चला महावीर जयंतीची अधिकृत सुट्टी दिली जाऊ शकते.एकंदरीत, योग्य नियोजन केल्यास मार्च महिन्यात सलग सहा ते आठ दिवसांची सुट्टी घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गासाठी मार्च महिना आनंददायी ठरणार आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *