तुम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI चा वापर करताय का? म्हणजे अगदी एखाद्या विषयावरील माहिती शोधण्यापासून ट्रिप प्लॅन करण्यापर्यंत AI तुम्हाला सर्व कामांत मदत करतो. AI वरून अनेक लोकं कंटेट(Content) देखील कॉपी पेस्ट करतात. म्हणजेच AI ने दिलेली माहिती तुम्ही देखील तशीच शेअर करत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Zoho कॉरपोरेशचे के को-फाउंडर आणि चीफ साइंटिस्ट श्रीधर वेम्बू यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करणाऱ्या टेक प्रोफेशनल्ससाठी एक इशारा जारी केला आहे. त्यांनी याबाबत त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट देखील शेअर केली आहे.श्रीधर वेम्बू यांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही AI चा योग्य वापर केला तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकता आणि तुमच्या कामाची गती देखील वाढू शकते. मात्र जर तुम्ही AI वर पूर्णपणे अवलंबून राहिलात किंवा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलात तर ही एक गंभीर बाब आहे. यामुळे प्रोडक्टिविटीमध्ये घट होऊ शकते.

श्रीधर वेम्बू यांनी म्हटलं आहे की, “ AI उत्पादनाचा अनुभव सुधारू शकते, जसे की X मधील Grok करतो. पण मी त्यातून नवीन कंटेंट तयार करण्याच्या बाजूने नाही. कस्टमर सपोर्टचा विचार केला तर, ते एजेंट्सना जलद काम करण्यास मदत करते परंतु या सर्वांमुळे AI ला माणसांची जागा देणे योग्य नाही. सर्वात चुकीची गोष्ट म्हणजे AI ने लिहिलेला टेक्स्ट ग्राहकांना न कळवता पाठवणे.

अगस्त 2025 मध्ये X वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये श्रीधर वेम्बू यांनी म्हटलं आहे की, मी रोज दोन ते तीन वेळा AI चॅट टूल्सचा वापर करतो. मी माझ्या फोनमध्ये टॉप-5 AI अ‍ॅप्स इंस्टॉल केले आहेत. मी AI चा “मॉडरेट ते हेवी यूजर” आहे. AI मुळे माझी वेब सर्चिंग 80% पर्यंत कमी झाली आहे. कारण AI म्हणजे वेगाने शिकण्याची पद्धत आहे.

वेम्बू यांनी सांगितल्याप्रमाणे, AI ग्राहक सेवा जलद बनवू शकते. परंतु AI पूर्णपणे मानवांची जागा घेऊ शकत नाही. त्यांनी असेही म्हटले की AI ने लिहिलेला कोड थेट वापरणे धोकादायक आहे. त्यासाठी कठोर कंप्लायंस, गोपनीयता आणि सिक्योरिटी रिव्यू करणे आवश्यक आहे. जर ही प्रक्रिया वगळली तर डेवलपर्स अव्यावसायिकपणे वागतील. त्यांच्या मते, काही प्रकरणांमध्ये AI ने दिलेला कंटेट आपला वेळ वाचवू शकतो.

पण त्यामुळे आपला विकास आणि वेब सर्चिंग देखील कमी होऊ शकते(Content). प्रोडक्टिविटीमध्ये घट होऊ शकते. वेम्बू यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, Zoho त्यांच्या प्रोग्रामरना शिकण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर करण्यास प्रोत्साहित करते. परंतु मानवी निर्णय घेण्याची क्षमता AI द्वारे बदल शकत नाही.

हेही वाचा :

मध्यरात्री अपघाताचा थरार; मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवलं

‘दादा तुमच्यावर प्रेम करतो’ म्हणत विवाहितेने टाकला नवरा, पुढे….

मालकाच्या पैशांवर नोकराचा डाव; चोरी करून SIP, FD मध्ये गुंतवणूक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *