देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ५७९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन (prepaid plan) सादर करत मध्यम मुदतीच्या रिचार्जची गरज असलेल्या ग्राहकांना आकर्षक पर्याय दिला आहे. कमी खर्चात पुरेसा डेटा आणि दीर्घ वैधता मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा प्लॅन उपयुक्त मानला जात आहे. सर्वांनाच 5G डेटाची गरज नसते, हे लक्षात घेऊन हा प्लॅन 4G वापरकर्त्यांसाठी खास फायदेशीर ठरू शकतो.

या ५७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये (prepaid plan) ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. त्यासोबत दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मोफत दिले जातात. या प्लॅनची वैधता तब्बल ५६ दिवसांची असल्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. दैनंदिन वापरासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ब्राउझिंगसाठी हा डेटा पुरेसा ठरू शकतो.
या प्लॅनसोबत जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊड यांसारख्या (prepaid plan) डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. विशेष म्हणजे ग्राहकांना १८ महिन्यांचे गुगल जेमिनी एआय प्रो सबस्क्रिप्शन कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता उपलब्ध करून दिले जात आहे, ज्याची बाजारमूल्य सुमारे ३५,१०० रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र ही ऑफर सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या १.५ जीबी दैनिक डेटा प्लॅनवर सक्रिय राहणे आवश्यक आहे.
फेअर यूसेज पॉलिसी (FUP) अंतर्गत दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग ६४ Kbps पर्यंत कमी होतो. त्यामुळे जास्त डेटा वापरणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
दरम्यान, कंपनीकडे १.५ जीबी दैनिक (prepaid plan) डेटा देणारे इतरही स्वस्त प्लॅन उपलब्ध आहेत. २३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २२ दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी डेटा दिला जातो. तसेच २९९, ३१९, ३२९, ६६६ आणि ८८९ रुपयांचे विविध पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र सध्या संपूर्ण वर्षभर दररोज १.५ जीबी डेटा देणारा कोणताही प्लॅन उपलब्ध नाही.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!