पुण्यात गुन्हेगारीच प्रमाण कमी नाहीय. तिथे चोरी, दरोडा, हत्या, वाहनांची तोडफोड, छेडछाड असे गुन्हे घडतच असतात. आता त्याच पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला लाज आणणार हा प्रकार आहे. ज्याला मित्र(friend) म्हणून घरी आणलं, त्यानेच दगा दिला. घरातल्या इज्जतीवर हात टाकला. फॅमिली फ्रेंडच्या या घृणास्पद कृत्याने सगळ्या पुण्याला धक्का बसला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी 44 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. 2019 साली फिर्यादी त्यावेळी केवळ 19 वर्षांची होती, तेव्हापासून हा अत्याचार सुरू झाला. आरोपी व फिर्यादीचं कुटुंब परस्परांच्या चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ये-जा करायचा. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले(friend). नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला.

2019 पासून 2025 पर्यंत या काळात अनेकदा धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केले. घरात कोणी नसताना किंवा फिरताना, चारचाकीतून प्रवास करताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. 2020 ते जुलै 2025 दरम्यान आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या नराधमाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. रोज घरात वावरणाऱ्या व्यक्तीचं हे घृणास्पद वर्तन ऐकून कुटुंबीय स्तब्ध झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64, 64(2)(M), 74, 351(2) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) 2012 मधील कलम 4, 8, 10, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.
हेही वाचा :
सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय?
रोजगाराच्या संधी वाढणार; मुख्यमंत्र्यांची आयटी पार्क स्थापन करण्याची घोषणा
राहुल गांधी यांची बिहार यात्रा आणि निर्वाचन आयोगाचा खुलासा