इचलकरंजी :
भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे(worker) प्रमोद बचाटे यांना त्यांच्या निष्ठावान कार्याचा सन्मान मिळाला असून पक्षाने त्यांना इचलकरंजी पश्चिम युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करून मोठी जबाबदारी दिली आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी इचलकरंजी मंडलातील काही महत्वाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये सतत तळागाळात राहून कार्यकर्त्यांशी जोडलेले राहणारे व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेणारे प्रमोदजी बचाटे यांना ही संधी मिळाली आहे.

या नियुक्तीनंतर इचलकरंजी शहरासह गावभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. गोरगरिबांच्या समस्या असोत वा गावभागातील तरुणांचे प्रश्न, (worker)त्यासाठी झटणारा नेता म्हणून प्रमोद बचाटे यांची ठळक ओळख आहे. युवांच्या गळ्यातील ताईत आणि लोकमान्य युवा नेता म्हणून त्यांचा ठसा उमटलेला आहे.
पक्षाप्रती दाखविलेली एकनिष्ठता, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि प्रामाणिक कामामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे इचलकरंजी पश्चिम भागातील युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून आगामी काळात ते युवा वर्ग व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणखी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि समर्थक यांनी प्रमोद बचाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.(worker) या नियुक्तीमुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला बळकटी मिळणार असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून लोकसेवेची संधी मिळावी, अशी इच्छा जनतेतून व्यक्त होत आहे. शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे
हेही वाचा :
अनैतिक संबंधाच्या संशयातून संताप; नवऱ्याने जावयाच्या मुलाचा गुप्तांग तोडला
Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन