सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल (demand) व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गॅसचा पुरवठा अनियमित झाल्याने अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले असून कामगारांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान कामगारांच्या जेवणासाठी तरी एखादा सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हॉटेल मालकांकडून करण्यात येत आहे.

गॅस एजन्सीकडून सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक हॉटेल मालकांना (demand) हॉटेलचा वेळ कमी करावा लागत आहे. काही ठिकाणी तर हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यवसायावर आधीच वाढत्या खर्चाचा ताण असताना आता गॅस टंचाईमुळे आणखी संकट वाढले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे दिवसातून दोन वेळचे जेवण हॉटेलमध्येच बनवले जाते. (demand) मात्र गॅस नसल्याने तेही शक्य होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान एक तरी सिलेंडर देऊन कामगारांच्या जेवणाची सोय करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.दरम्यान, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *