Instagram वापरणाऱ्या (shocking news) कोट्यवधी युजर्ससाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. 8 मे 2026 पासून या प्लॅटफॉर्मवरील खाजगी चॅटिंगसंदर्भात महत्त्वाचा बदल लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर प्रायव्हसीबाबत नेहमीच चर्चा होत असताना आता या निर्णयामुळे पुन्हा एकदा युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Meta Platforms च्या मालकीच्या Instagram ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीत (shocking news) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलानुसार Instagram च्या डायरेक्ट मेसेज (DM) मध्ये असलेले एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) फीचर काढून टाकण्याची तयारी कंपनी करत आहे. त्यामुळे 8 मे 2026 नंतर पाठवले जाणारे मेसेज पूर्वीसारखे पूर्णपणे खासगी राहणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर संवाद साधताना युजर्सना (shocking news) सर्वात मोठी चिंता असते ती त्यांच्या प्रायव्हसीची. खासगी चॅट करताना ते संभाषण फक्त दोन व्यक्तींमध्येच मर्यादित राहावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र आता होणाऱ्या या बदलामुळे Instagram वर पाठवलेले मेसेज आणि मीडिया फाइल्सवर कंपनीला प्रवेश असण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ही अशी सुरक्षा प्रणाली आहे ज्यामध्ये दोन व्यक्तींमधील संभाषण तिसऱ्या कोणालाही वाचता येत नाही. अगदी प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपनीलाही त्या संदेशांमध्ये प्रवेश करता येत नाही. Instagram ने डिसेंबर 2023 मध्ये हे फीचर लागू केले होते, जेणेकरून युजर्सचे खाजगी संभाषण अधिक सुरक्षित राहील.
मात्र आता कंपनीने या फीचरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, 8 मे 2026 नंतर Instagram वरील मेसेजेस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार नाहीत. त्यामुळे युजर्सच्या संभाषणाचा सुरक्षा स्तर कमी होऊ शकतो आणि कंपनीला चॅट किंवा मीडिया फाइल्सवर प्रवेश मिळण्याची शक्यता वाढू शकते.
या निर्णयामागे काही आंतरराष्ट्रीय (shocking news) दबाव असल्याचेही सांगितले जात आहे. बाल शोषणाशी संबंधित सामग्री रोखण्यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन अडथळा ठरत असल्याचा मुद्दा अनेक देशांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. विशेषतः अमेरिका आणि युनायटेड किंगडममधील सरकारी संस्थांनी CSAM म्हणजेच बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट शोधण्यासाठी अशा एन्क्रिप्शनवर मर्यादा आणण्याची मागणी केली होती.
याच पार्श्वभूमीवर Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रायव्हसी (shocking news) आणि सुरक्षिततेचा समतोल राखण्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता 8 मेनंतर Instagram युजर्सच्या चॅटिंग अनुभवात नेमका किती बदल होतो, याकडे जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?