सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला (shortage) बसत आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्याने नैसर्गिक वायू तसेच कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी जगातील अनेक देशांमध्ये वीज महागली आहे. सोबतच पेट्रोल, डिझेल, घरगुती, व्यावसायिक गॅसची किंमतही वाढली आहे.

परंतु या युद्धामुळे आता थायलंडमध्ये ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर (shortage) थेट हाफ पँट आणि टी-शर्टवर काम करण्याची वेळ आली आहे. ऑफिसला जायचं म्हटलं फॉर्मल कपडे घालून, टाय, कोट, शूज असा वेश असतो. परंतु आता थायलंडमध्ये सगळं बदललं आहे.

थायलंडमध्ये ऑफिसमध्ये (shortage) जाताना फॉर्मल कपडे, सूट, कोट, टाय परिधान न करता आता हाप पँट आणि टी-शर्ट परिधान करायला परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे कॅज्यूअल कपडे परिधान केल्यास गरमी होत नाही. कर्मचारी एसी सुरू न करता काम करू शकतात, असा दावा तेथे केलाज जातोय.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी एसीचा उपयोग कमी केला तर देशात कोट्यवधी (shortage) यूनिट वीज वाचू शकते, असा तर्क तिथे लावला जात आहे. थायलंडमध्ये नैसर्गिक वायूच्या मदतीने उर्जा निर्मिती करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठाच खंडित झाला आहे.

परिणामी थायलंडवर उर्जासंकट आले आहे. याच कारणामुळे थायलंडने वेगवेगळ्या कार्यालयांत कमीत कमी एसी वापरला जावा म्हणून कर्मचाऱ्यांना कॅज्यूअल ड्रेसमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *