पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर झाले (ongoing conflict) असून त्याचा परिणाम आता भारतातील इंधन बाजारावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर दबाव वाढत असताना भारतात मात्र CNG वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत CNG कार रस्त्यावर जणू ‘VIP’ ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी (ongoing conflict) परिसरात वाढलेल्या सागरी धोक्यामुळे ऊर्जा पुरवठ्याबाबत अनेक देश सतर्क झाले आहेत. भारत सरकारनेही संभाव्य तुटवड्याचा विचार करून नैसर्गिक वायूच्या वापराला प्राधान्य देणारे धोरण राबवले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशांतर्गत गॅस वितरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित केला असून सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन क्षेत्राला सर्वात वरचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) आणि वाहनांसाठीचा CNG पुरवठा सर्वप्रथम सुनिश्चित केला जात आहे.
गॅसचा पुरवठा कमी झाला तरी खत कारखाने किंवा वीज निर्मिती (ongoing conflict) प्रकल्पांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कपात करून सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरांवर किंवा दैनंदिन प्रवासावर परिणाम होऊ नये, याची सरकारकडून काळजी घेतली जात आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण झाल्या तरी CNG आणि PNGचा पुरवठा तुलनेने स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती थेट आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असतात. मात्र CNG च्या किंमती ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. देशांतर्गत सूत्रांवर आधारित किंमत निर्धारण आणि त्यावर असलेली कमाल मर्यादा यामुळे जागतिक बाजारात गॅसचे दर वाढले तरी भारतातील अनेक शहरांमध्ये CNG च्या किंमती तुलनेने स्थिर राहतात. यामुळेच दिल्ली, नोएडा यांसारख्या शहरांमध्ये CNG पंपांवरील दरांमध्ये मोठे चढउतार दिसत नाहीत.
भारतातील अनेक महानगरांमध्ये (ongoing conflict) सार्वजनिक वाहतूक मोठ्या प्रमाणात CNGवर चालते. दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसेस, मोठ्या प्रमाणातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी CNGचा वापर करतात. जर अचानक CNGचा पुरवठा खंडित झाला किंवा त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली, तर शहरांच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता असते.
सरकारच्या ‘गॅस आधारित अर्थव्यवस्था’ या दीर्घकालीन धोरणातही CNGला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील गॅस प्रकल्पांवर भर दिला जात असून दीर्घकालीन आयात करारांद्वारेही गॅस उपलब्धतेची खात्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, पेट्रोलच्या विक्रमी किंमती (ongoing conflict) आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर CNG आता केवळ स्वस्त पर्याय राहिलेला नाही, तर मध्यमवर्गीयांसाठी सर्वात व्यवहार्य इंधन ठरत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत CNG कार असलेले वाहनचालक तुलनेने निर्धास्त दिसत असून इंधन संकटाच्या काळात त्यांची गाडी जणू रस्त्यावर ‘VIP’ असल्यासारखीच मानली जात आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?