बॉलिवूड आणि संगीतविश्वात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. (controversy) प्रसिद्ध सिंगर-रॅपर Badshah याच्या हरियाणवी गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणात कुख्यात Lawrence Bishnoi Gang ने थेट धमकी देत एंट्री केल्याने वातावरण अधिकच तापले आहे. गँगकडून सोशल मीडियावर पोस्ट करत बादशाहला थेट गोळी मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हरियाणातील Panipat येथे (controversy) नुकतीच गोळीबाराची एक घटना घडली होती. शनिवारी (14 मार्च) असंध रोडवरील वेस्टर्न युनियन कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेची जबाबदारी घेताना लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे रणदीप मलिक आणि अनिल पंडित (USA) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी हा गोळीबार हवाला व्यवसाय करणाऱ्यांसाठी ‘ट्रेलर’ असल्याचा इशाराही दिला.
याच पोस्टमध्ये गँगने सिंगर बादशाहवर गंभीर आरोप करत थेट धमकी (controversy) दिली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बादशाह, तू हरियाणाची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहेस. 2024 मध्ये तुझ्या क्लबमध्ये तुला ट्रेलर दाखवला होता, पुढच्या वेळी थेट तुझ्या कपाळात गोळी मारू.” या धमकीमुळे संगीतविश्वासह चाहत्यांमध्येही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बादशाहचे ‘टटीरी’ हे गाणे 1 मार्च रोजी रिलीज झाले होते. गाणे प्रदर्शित होताच त्याच्या बोलांवर आणि व्हिडिओतील काही दृश्यांवर आक्षेप घेतला गेला. वाद वाढल्यानंतर बादशाहने सार्वजनिकरित्या माफी मागत कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीदेखील हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही.
या प्रकरणात सर्वप्रथम Haryana State Women Commission कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. गाण्याचे बोल आणि व्हिडिओमधील दृश्ये महिलांचा अपमान करणारी असल्याचा आरोप करण्यात आला. वाद तीव्र झाल्यानंतर हे गाणे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात काही कलाकार (controversy) बादशाहच्या समर्थनातही पुढे आले आहेत. अनेकांनी गाण्यांमधील आशयाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे सांगत कलाकारांना लक्ष्य करण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र धमकीच्या घटनेमुळे या प्रकरणाकडे आता कायदा अंमलबजावणी यंत्रणांचेही लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?