अंडरवर्ल्डच्या काळ्याकुट्ट जगातील थरार आणि क्रौर्य दाखवणाऱ्या धुरंधर या चित्रपटाने (underworld) प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठी दाद मिळवली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात कुख्यात गुन्हेगार रहमान डकैतची भीतीदायक कथा पडद्यावर साकारण्यात आली आहे. चित्रपटात अक्षय खन्ना यांची भूमिका विशेष गाजत असून त्यांच्यासोबत संजय दत्त, रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि आर. माधवन यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील कथेमुळे अंडरवर्ल्डमधील काही धक्कादायक घटनांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

चित्रपटात दाखवण्यात (underworld)आलेल्या कथेनुसार रहमान डकैत हा अत्यंत क्रूर आणि निर्दयी गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्या नावानेच अनेकांना भीती वाटायची. एका घटनेत त्याचा थेट सामना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी झाल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार २००९ मध्ये एका व्यावसायिकाला एका डॉनकडून फोन आला होता. त्या डॉनला त्याची मौल्यवान जमीन खरेदी करायची होती आणि त्याने त्यासाठी १२ कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र त्या जमिनीची वास्तविक किंमत सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचे त्या व्यावसायिकाने सांगितले. यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्या डॉनने धमकी दिली की ऑफर स्वीकारली नाही तर जमीनही राहणार नाही आणि पैसेही मिळणार नाहीत.
ही बाब त्या व्यावसायिकाने रहमान डकैतला सांगितल्याचे म्हटले (underworld)जाते. कारण तो व्यावसायिक रहमानचा नातेवाईक असल्याचे समोर आले. यानंतर रहमानने थेट त्या व्यक्तीला फोन करून जमिनीवर दावा सोडण्याची सूचना दिली. मात्र हा वाद वाढत गेला आणि त्यात अंडरवर्ल्डमधील तणाव तीव्र झाल्याचे सांगितले जाते. काही कथनांनुसार या वादानंतर नूर उल हक उर्फ नूरा, जो दाऊदचा भाऊ होता, त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली होती, असेही सांगितले जाते.
दरम्यान ‘धुरंधर’ (underworld)चित्रपटात रहमान डकैतचे व्यक्तिमत्त्व अत्यंत भयानक आणि निर्दयी दाखवण्यात आले आहे. अनेकांना क्रूर पद्धतीने ठार मारणारा गुन्हेगार म्हणून त्याची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या शेवटी त्याचा शेवट दाखवण्यात आला असला तरी कथानक पुढे कसे उलगडणार याबाबत उत्सुकता कायम आहे. त्यामुळे आता ‘धुरंधर’च्या संभाव्य सिक्वेलकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. धुरंधर 2 मध्ये या कथेला पुढे कोणता वळण मिळणार, याची चर्चा सध्या सिनेसृष्टीत जोरात सुरू आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?