गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा अत्यंत महत्त्वाचा सण (Hindu New Year) असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा १९ मार्च रोजी राज्यासह देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसाला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण नवीन वस्तूंची खरेदी करतात तसेच घरासमोर गुढी उभारून आनंदाने नववर्षाचे स्वागत करतात.

गुढी उभारताना काही (Hindu New Year) पारंपरिक वस्तूंचा समावेश केला जातो. त्यामध्ये कडुनिंबाचा पाला आणि साखरेचे बत्ताशे यांना विशेष स्थान आहे. गुढीला कडुनिंब का लावला जातो, यामागे धार्मिकतेसोबतच आरोग्याशीही निगडित कारण असल्याचे सांगितले जाते. गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात येतो आणि याच महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागते. हिवाळा संपून उष्णतेची सुरुवात होत असताना वातावरणात आणि हवामानात मोठे बदल होतात. या बदलांचा परिणाम अनेकदा मानवी आरोग्यावरही दिसून येतो.
कडुनिंबाला आयुर्वेदात विशेष महत्त्व दिले गेले आहे. कडुनिंबाच्या पानांमध्ये शरीरातील दाह कमी करण्याची आणि उष्णतेचा परिणाम कमी करण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. त्यामुळे ऋतू बदलाच्या काळात शरीराला संरक्षण मिळावे आणि कडुनिंबाचे महत्त्व लक्षात राहावे, या उद्देशाने गुढीला कडुनिंबाची डहाळी बांधण्याची परंपरा आहे.
गुढीसाठी कडुनिंब घेताना तो हिरवागार आणि ताजा असावा, अशीही परंपरागत (Hindu New Year) समजूत आहे. या काळात कडुनिंबाच्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. शक्यतो फुलांसहित कडुनिंबाची डहाळी आणून ती साखरेच्या बत्ताशांसोबत गुढीला बांधली जाते. कडुनिंबाचा कडवटपणा आणि बत्ताशांचा गोडवा हे जीवनातील सुख-दुःखाचे प्रतीक मानले जाते. ऋतू बदलाच्या काळात जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांचा समतोल राखण्याचा हा संदेशही या परंपरेतून दिला जातो.
आरोग्याच्या दृष्टीनेही (Hindu New Year) कडुनिंब अत्यंत उपयुक्त मानला जातो. कडुनिंबाची पाने रक्तशुद्धी करण्यास मदत करतात तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो, असे आयुर्वेदात सांगितले जाते. त्यामुळे अनेकजण या काळात कडुनिंबाच्या पानांचा रस पिण्याची प्रथा पाळतात. गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ, खोबरे आणि कडुनिंब एकत्र करून त्याचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि तोच प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करतात. परंपरा, आरोग्य आणि ऋतू बदल यांचा सुंदर संगम या प्रथेतून पाहायला मिळतो.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?