पुणे शहरात वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने (Rules) मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विशेष नियम लागू करण्याचा विचार सुरू असून जुन्या वाहनांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांनी नव्या नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.
पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये विशेषतः शिवाजीनगर आणि पेठ भागात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हा उपाय विचाराधीन असून अधिक प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर शुल्क आकारण्याची योजना आखली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

प्राथमिक माहितीनुसार, भारत स्टेज-3 किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिन (Rules) तंत्रज्ञानाच्या वाहनांना या क्षेत्रात प्रवेशासाठी दररोज विशेष शुल्क भरावे लागू शकते. संबंधित शुल्क आधी भरले नसल्यास नियम मोडणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्यांच्या मदतीने दंड आकारला जाईल. सुरुवातीला हा नियम शिवाजीनगर आणि पेठ परिसरात लागू करण्याचा विचार आहे. पुढील टप्प्यात त्याचा विस्तार शहरातील इतर भागांमध्ये करण्याचाही प्रशासनाचा विचार आहे.अभ्यासानुसार पुणे शहरातील वायू प्रदूषणात वाहनांचा मोठा वाटा आहे. 2020 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनात पुणे महानगर क्षेत्रातील सूक्ष्म कण PM 2.5 प्रदूषणापैकी सुमारे 46 टक्के प्रदूषण केवळ वाहनांमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले. हे सूक्ष्म कण मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जातात. याशिवाय 2023 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे 70 टक्के वाहनांमध्ये भारत स्टेज-4 किंवा त्यापेक्षा जुने इंजिन तंत्रज्ञान असल्याचे आढळले.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वर्ष 2000 पूर्वी नोंदणी झालेली एक कार (Rules) सुमारे 11 आधुनिक भारत स्टेज-6 कारइतके प्रदूषण निर्माण करू शकते. तसेच जुन्या प्रकारच्या एका ट्रकमुळे जवळपास 14 आधुनिक ट्रकांइतके प्रदूषण होते. भारत स्टेज-6 डिझेल कारमधून उत्सर्जित होणारे सूक्ष्म कण भारत स्टेज-3 कारच्या तुलनेत सुमारे 90 टक्क्यांनी कमी असतात.
या पार्श्वभूमीवर लो एमिशन झोन लागू करण्यासोबतच शहरातील पदपथ अधिक चालण्यायोग्य करणे, सार्वजनिक बस सेवा वाढवणे आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावरही प्रशासनाने भर देण्याचे ठरवले आहे. स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी शहर निर्माण करण्यासाठी या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *