टीव्ही विश्वाताली लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत झुबैर आणि (Attacked) तिचा भाऊ अयान झुबैर यांच्याबद्दल मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. असं सांगितलं जात आहे की, जन्नत आणि अयान यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पनवेल येथे दोघांवर हल्ला झाला आणि हल्ल्यात भाऊ – बहीण जखमी अल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय जन्नत आणि अयान यांनी देखील यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही…जन्नत आणि अयान हल्लात जखमी झाल्याची माहिती समोर येतात चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. शिवाय चाहत्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जन्नत आणि अयान काही दिवसांपूर्वी पनवेल याठिकाणी गेले होते… तेथे त्यांच्यावर हल्ला झाला…

14 मार्च रोजी सोशल मीडियावर जन्नत आणि अयान यांच्यावर (Attacked) हल्ला झाल्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यामुळे दोघे जखमी असल्याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचली. पण, जन्नत जुबैर, तिच्या कुटुंबियांनी किंवा पनवेल पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेलं नाही. त्यामुळे नक्की कधी आणि काय घडलं याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
जन्नत जुबैर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बालकलाकार म्हणून तिने (Attacked) अभिनय विश्वात पदार्पण केलं. ‘फुलवा’ मालिकेमुळे जन्नत हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जन्नत हिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. जन्नत हिने टीव्ही विश्वासोबत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील नशीब आजमावलं आहे… अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’ ते अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘लव का दी एंड’ सिनेमात जन्नत हिने काम केलं आहे.जन्नत जुबैरप्रमाणेच त्याचा भाऊ अयान जुबैरनेही टीव्ही शोमध्ये आपला हात आजमावला आहे. त्याने “जोधा अकबर” या लोकप्रिय मालिकेत प्रिन्स सलीमची भूमिका साकारली होती. आता तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज