गुगल बहुप्रतिक्षित पिक्सेल 10 सिरीज उद्या 20 ऑगस्टला लाँच करणार आहे.(Pixel) या सिरीजमध्ये पिक्सेल 10, 10 प्रो, 10 प्रो एक्सएल आणि 10 प्रो फोल्ड असे चार शानदार मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. लाँचपूर्वीच लीक झालेल्या माहितीमुळे स्मार्टफोनप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा गुगलने डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल घडवले असून ही सिरीज स्मार्टफोन बाजारात नवा बेंचमार्क ठरेल अशी अपेक्षा आहे.

यंदा गुगलने कॅमेरा क्वालिटी एक वेगळ्याच लेवलची ठेवली आहे. पिक्सेल 10 मध्ये पहिल्यांदाच ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे ज्यामध्ये टेलिफोटो लेन्सचा समावेश असेल.(Pixel) यामुळे फोटोग्राफीला नवा आयाम मिळेल. प्रो आणि प्रो एक्सएल मॉडेल्समध्ये पिक्सेल 9 प्रो सारखाच ट्रिपल कॅमेरा सेटअप कायम राहील पण नव्या एमपी कॉन्फिगरेशनसह. यामुळे वापरकर्त्यांना बेस्ट फोटो आणि व्हिडिओ क्वालिटी मिळेल.

गुगलच्या प्रोसेसरबाबत नेहमीच चर्चा होत असते. यंदा कंपनीने सॅमसंगच्या एक्सिनोसऐवजी TSMC आर्किटेक्चरवर आधारित नवीन प्रोसेसर आणले आहे. हा प्रोसेसर गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी अधिक सक्षम असला तरी क्वालकॉम किंवा मीडियाटेकशी स्पर्धा करू शकेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल.(Pixel) बॅटरीच्या बाबतीतही गुगलने मोठा बदल केला आहे. पिक्सेल 10 सिरीजमध्ये मोठी बॅटरी आणि Qi2 मॅग्नेटिक चार्जिंग तंत्रज्ञानाची सुविधा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आयफोनसारखा चार्जिंग अनुभव मिळेल.पिक्सेल 10 काळा, इंडिगो, फ्रॉस्ट आणि लिमोन्सेलो रंगांमध्ये उपलब्ध असेल तर प्रो मॉडेल्स पोर्सिलेन, जेड आणि मूनस्टोन रंगांत लॉंच होईल. फोल्ड 10 मूनस्टोन आणि जेड रंगांमध्ये येण्याची शक्यता आहे. गुगलने लाँचपूर्वीच डिझाइन उघड केले असून त्याची आकर्षक शैली चाहत्यांना भुरळ घालत आहे.

हेही वाचा :

50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा

ग्राहकांसाठी आनंदसरी! खिशाचा भार कमी होणार; सोन्याचा आजचा भाव किती ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *