दिल्लीमध्ये एका ८ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केल्याची (home)संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही मुलं ही अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत असून परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. तसेच पालकवर्गातून संताप व्यक्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षांची मुलगी घरासमोरील अंगणात खेळत असताना १३ वर्षांची तीन मुलं तिच्याजवळ आली. त्यांनी तिला गोड बोलून एका निर्जनस्थळी नेलं. तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिने प्रतिकार करून सुद्धा आरोपींनी तिला सोडले नाही.

तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र मुलांनी तिला (home) धमकावलं आणि सोडून दिल. मुलीने तिथून पळ काढला आणि आईपाशी जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. (home) दिल्ली पोलिसांनी तिन्ही आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी सखोल तपास करत असून आरोपींना कठोर शिक्षा करू. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *