जर तुम्हाला तुमचे सिम सक्रीय ठेवायचे असेल तर किफायतशीर दरात बेसिक (SIM active) कनेक्टीव्हीट घ्यायची असेल तर जिओचा 189 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर परवडणाऱ्या प्लान श्रेणी अंतर्गत हा प्लान सूचीबद्ध केला आहे.

या बजेट-फ्रेंडली जिओ प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग (SIM active) मिळते, ज्यामुळे तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता. याव्यतिरिक्त, या प्लानमध्ये 300 एसएमएस संदेशांचा समावेश आहे.डेटाच्या बाबतीत या प्लानमध्ये एकूण 2 जीबी डेटा मिळतो. मात्र, हा दैनंदिन डेटा प्लान नाही. त्याऐवजी तुम्हाला संपूर्ण वैधता कालावधीत वापरण्यासाठी एकूण 2 जीबी डेटा मिळतो. डेटा अलाउन्स संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होते.

तसेच या प्लानचे सदस्यत्व घेणाऱ्यांना (SIM active) जिओकडून अनेक विशेष डिजिटल सेवांचा लाभ मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड सारख्या सेवांचा मोफत वापर करता येतो. या अॅप्सद्वारे, युजर मनोरंजनापासून ते क्लाऊड स्टोरेज सोल्यूशन्सपर्यंत विविध वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतात.

जिओच्या या उत्तम प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. याचा अर्थ तुम्हाला अगदी कमी किमतीत (SIM active) सुमारे एक महिना कॉलिंग आणि बेसिक इंटरनेट सेवा मिळतात. हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे जे पैसे खर्च न करता त्यांचे सिम कार्ड सक्रिय ठेवू इच्छितात.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *