सध्याच्या जगात फोन हा खूप महत्त्वाचा झाला आहे. (network) कोणत्याही गोष्टीसाठी अवघ्या काही सेकंदात कॉल किंवा मेसेज करतात. अनेकदा तुम्हाला पूर्ण नेटवर्क असले तरीही कॉल लागत नाही. सिग्नल असूनही फोन लागत नसेल तर मनस्ताप होतो. नेहमीच जर असे असेल तर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये काहीतरी ऑन राहिले असेल. त्यामुळे तुम्हाला ही अडचण येत असेल तर हे काम करा.

दिवसभर तुम्ही बॅटरी सेव्हर मोड सुरु ठेवा. जेणेकरुन फोनमध्ये (network) जास्त वेळ बॅटरी राहिल. बॅटरी सेव्हरमुळे बॅकग्राउंडमध्ये सुरु असणाऱ्या इतर सेवा बंद होतात. यामुळे फायदा होतो. परंतु जर तुम्ही विनाकारण बॅटरी सेव्हर मोड ऑन ठेवला तर कॉल घेण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच बॅटरी सेव्हर मोड ऑन करा.

अनेक ठिकाणी 5G नेटवर्क नाहीये. यामुळे 5G आणि 4G मध्ये स्विच होत राहते. (network) यामुळे कॉल केल्यावर चांगला आवाज येत नाही. अचानक आवाज जातो.त्यामुळे तुमच्या नेटवर्कवरदेखील कॉलिंगची गुणवत्ता ठरलेली असते.अनेकदा तुमच्या फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे फोन लागत नाही. तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट नसेल त्यामुळे फोन वापरताना अनेक अडचणी येतात. यामुळे तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट करा.जेणेकरुन तुम्हाला अडचण येणार नाही. फोन जर अपडेट नसेल तर हँगदेखील होतो. अनेक अॅप ओपन होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे फोन अपडेट असणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *