कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध (commotion)जोतिबा डोंगर परिसरात रविवारी मोठा गोंधळ उडाला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानक तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर हायव्होल्टेज ड्रामाला सुरुवात झाली. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या काही तरुणांनी नियमांना न जुमानता बिगर सासनकाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तेथील पुजाऱ्यांनी त्यांना(commotion) रोखण्याचा प्रयत्न केला असता, वाद विकोपाला गेला. संतप्त झालेल्या तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच हात उगारल्याची धक्कादायक घटना घडली. काही काळासाठी मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांमध्ये घबराट पसरली आणि काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.
ज्योतिबा मंदिर में पुजारियों का उत्पात, श्रद्धालुओं की बेरहमी से की पिटाई
— NDTV India (@ndtvindia) March 23, 2026
महाराष्ट्र के कोल्हापुर स्थित ज्योतिबा मंदिर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां 15 से 20 पुजारियों के एक समूह ने दो श्रद्धालुओं के साथ बेरहमी से मारपीट की. सोशल मीडिया पर वीडियो वायरल.#Maharashtra pic.twitter.com/qtLMszFkxA
घटनेची माहिती मिळताच(commotion) स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत आणि शिस्तीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
