कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर येथे घडलेल्या मारहाणीच्या घटनेने (An incident) संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने (An incident) जोतिबा डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. येत्या १ एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतून सासनकाठ्यांचे आगमन सुरू आहे. याच दरम्यान करवीर तालुक्यातील परिते गावातून मोठ्या संख्येने भाविक सासनकाठीसह वाजत-गाजत मंदिर परिसरात दाखल झाले. मात्र संबंधित सासनकाठी देवस्थान मान्यताप्राप्त नसल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीच्या वातावरणात काही भाविकांकडून गोंधळ आणि हुल्लडबाजी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

गुलाल उधळणे, इतर भाविकांना त्रास देणे तसेच पोलिसांशी हुज्जत घालणे असे (An incident) प्रकार घडल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. हा गोंधळ आवरण्याच्या प्रयत्नात पुजारी आणि पोलिसांनी संबंधितांना रोखण्याचा प्रयत्न केला. याचवेळी वाद अधिकच चिघळला आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. मंदिराचे पुजारी नवनाथ लादे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकांना रोखताना त्यांनीच अरेरावी केल्याचा आरोप केला आहे.

या घटनेनंतर जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली. दुसरीकडे परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी मात्र उलट आरोप करत पुजाऱ्यांकडूनच भाविकांवर अन्यायकारक मारहाण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दरम्यान, या घटनेचे अनेक (An incident) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. या प्रकरणी सुमारे ३० जणांविरोधात वारणा कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमका वाद कशामुळे झाला याचा सखोल तपास सुरू आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *